सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा वाढला…. महागाई भत्ता ‘इतका’ वाढणार

तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहात का किंवा तुमच्या परिवारातून अथवा मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत आहेत का? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण की, जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार याबाबत नवीन अपडेट हाती आली आहे.

Published on -

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे महागाई भत्ता वाढी संदर्भात. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढत असतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा तसेच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा दोनदा वाढतो.

पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित केला जातो. यावर्षी देखील जानेवारी महिन्यापासून चा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे आणि येत्या काही दिवसांनी जुलै महिन्यापासून चा महागाई भत्ता वाढीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

जानेवारी महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला. या महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% एवढा झालाय. दरम्यान आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.

किती वाढणार महागाई भत्ता?

जुलै महिन्यापासून केंद्रीय सहकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% नी वाढू शकतो असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. महागाई भत्ता वाढ एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरते. सध्याची या आयसीपीआयची आकडेवारी पाहिली असता यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असे बोलले जात आहे.

सध्या स्थितीला एआयसीपीआयची जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या चार महिन्यांची आकडेवारी समोर आली आहे. येत्या काही दिवसांनी मे आणि जून या दोन महिन्यांची आकडेवारी सुद्धा समोर येणार आहे. दरम्यान या आकडेवारी समोर आल्यानंतरच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार हे फिक्स होणार आहे.

पण तरीही सध्याची आकडेवारी पाहिली असता महागाई भत्ता यावेळी तीन टक्क्यांनी वाढू शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे. असे झाल्यास केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून थेट 58 टक्क्यांवर जाणार आहे.

अधिकृत शासन निर्णय कधी निघणार?

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% वरून 58% केला जाणार असून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हा दिवाळीच्या सुमारास निघेल. दरवर्षी दिवाळीच्या आसपास जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता सुधारित केला जात असतो.

यंदाही त्याच वेळेला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58% करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा अधिकृत शासन निर्णय जारी होण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही दिवाळीची एक मोठी भेट राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News