7th Pay Commission : केंद्रातील मोदी सरकारने मार्च 2025 मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. या महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवर पोहोचला आहे.
ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू असून आता जुलै 2025 पासून पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो, पहिला लाभ जानेवारी महिन्यात आणि दुसरा लाभ जुलै महिन्यात मिळतो.

जानेवारी महिन्यापासून जी महागाई भत्ता वाढ लागू केली जाते त्याचा अधिकृत शासन निर्णय हा साधारणता मार्च महिन्यात निघतो आणि जुलै महिन्यापासून जी महागाई भत्ता वाढ लागू केली जाते त्याचा अधिकृत शासन निर्णय हा साधारणता दसरा किंवा दिवाळीच्या आसपास निघतो.
महागाई भत्ता वाढ ही एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरते. जानेवारी महिन्यापासून जी महागाई भत्ता वाढ लागू झाली त्याबाबतचा निर्णय एआयसीपीआयच्या जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधी मधील आकडेवारीनुसार झाला.
दरम्यान आता जानेवारी ते जून 2025 या काळातील AICPI च्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार हे ठरणार आहे. अशातच आता या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. खरे तर गेल्या वेळी महागाई भत्ता फक्त दोन टक्क्यांनी वाढला यामुळे यावेळी महागाई भत्ता किती वाढणार हा मोठा प्रश्न आहे.
जुलै पासून महागाई भत्ता किती वाढणार?
अलीकडील महागाईच्या आकडेवारीनुसार, जुलै 2025 पासून महागाई भत्त्यात 4% वाढ मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे महागाई भत्ता सध्याच्या 55% वरून 59% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही वाढ जुलैपासून लागू होणार असली तरी, याची अधिकृत घोषणा ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या सणासुदीच्या हंगामात होईल अशी अपेक्षा आहे.
आकडेवारी काय सांगते?
ज्या निर्देशांकावरून महागाई भत्ता ठरवला जातो तो औद्योगिक कामगारांसाठीचा ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स (AICPI-IW) त्याची सध्याची आकडेवारी काय सांगते? त्याचा आढावा आता आपण या लेखातून घेणार आहोत. आतापर्यंत एआयसीपीआयची जानेवारी ते मे या कालावधीमधील आकडेवारी समोर आली आहे.
या आकडेवारीनुसार, मे 2025 मध्ये ए आय सी पी आय चे निर्देशांक 0.5 अंकांनी वाढून 144 वर पोहोचला. तसेच गेल्या तीन महिन्यांत या निर्देशांकात सातत्याने वाढ झाली आहे. मार्चमध्ये तो 143, एप्रिलमध्ये 143.5 होता आणि आता मे महिन्यात तो 144 वर पोहचला आहे. जर निर्देशांक असेच कायम राहिलेत आणि जूनमध्ये निर्देशांक 144.5 पर्यंत वाढला.
तर AICPI-IW चा 12 महिन्यांचा सरासरी निर्देशांक हा 144.17 च्या आसपास पोहोचण्याची अपेक्षा आहे. 7 व्या वेतन आयोगाच्या सूत्राचा वापर करून हे समायोजित केले तर DA अंदाजे 58.85% पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे सरकार जुलै महिन्यापासून महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवणार असे म्हटले जात आहे.
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सरकार पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवणार आहे. दरम्यान, आता आपण यावेळी केंद्रातील सरकार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढवणार ? याचा आढावा घेणार आहोत.