7th Pay Commission : देशातील एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वर्षात मोठी भेट मिळणार आहे. सरकार पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढवणार आहे. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. जानेवारी ते जून या महिन्यातील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार हा भत्ता लागू आहे.
आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र जुलै 2024 पासून या कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळतोय. दरम्यान, जानेवारी 2025 पासून पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे.

जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार हा भत्ता वाढवला जाणार आहे. अशातच कामगार विभागाची सप्टेंबर महिन्यापर्यंतची एआयसीपीआयची आकडेवारी समोर आली आहे.
कामगार विभागाने जाहीर केलेल्या जुलै ते सप्टेंबरच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, AICPI निर्देशांक 141.5 वर पोहोचला आहे आणि DA स्कोअर 54.49% वर पोहोचला आहे. पण, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आकडे येणे बाकी आहे.
यानंतर डीए किती वाढणार हे ठरणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2024 पर्यंत जर निर्देशांक 144-145 अंकांवर पोहोचला आणि DA स्कोअर 55% पेक्षा जास्त राहिला, तर DA मध्ये 3 टक्क्यांनी वाढ होण्याची खात्री आहे.
मात्र, अंतिम निर्णय मोदी सरकारला घ्यायचा आहे. तसेच जर आयसीपीआयचे निर्देशांक यापेक्षा अधिक आलेत तर महागाई भत्ता तीन टक्क्यांपेक्षा अधिक वाढणार आहे. यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे या आकडेवारीकडे विशेष लक्ष राहणार आहे.
वास्तविक, केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांचे DA/DR दर केंद्र सरकार वर्षातून दोनदा सुधारित करतात, जे AICPI निर्देशांकाच्या अर्धवार्षिक डेटावर अवलंबून असतात. ही वाढ जानेवारी आणि जुलैमध्ये होते.
जानेवारी 2024 पासून डीएमध्ये 4% आणि जुलैमध्ये 3% ने वाढ करण्यात आली होती, त्यानंतर DA 53% पर्यंत वाढला आहे. आता पुढील DA जानेवारी 2025 पासून वाढवला जाणार आहे, जो AICPI निर्देशांकाच्या सहामाही डेटावर अवलंबून असेल.
आत्तापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर नवीन वर्षात डीएमध्ये पुन्हा ३ टक्क्यांनी वाढ होऊ शकते, कारण नवीन दर जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहेत, अशा स्थितीत थकबाकीदारांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पाच्या आधी किंवा नंतर केव्हाही पंतप्रधान याबाबतचा निर्णय घेतील असे बोलले जात आहे.













