7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता वाढी संदर्भात.
खरंतर मार्च 2025 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के इतके करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला गेला आणि ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू झाली.

दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जातोय. राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तेलंगणा, अरुणाचल प्रदेश अशा विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर वाढवण्यात आला आहे.
मात्र अजून महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय झालेला नाही आणि यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे. महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय नेमका कधी होणार हाच प्रश्न राज्य कर्मचारी उपस्थित करत असून आज आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार?
महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी लवकरच फडणवीस सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे. फडणवीस सरकार येत्या काही दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करू शकते.
साधारणता जुलै 2025 पर्यंत राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जाईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातो. जुलै महिन्याच्या पगारांसोबत राज्य कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे पण ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहील म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे.
किती वाढणार महागाई भत्ता ?
राज्य शासकीय सेवेतील कार्यरत राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दोन टक्के डीए वाढीची भेट मिळणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% इतका आहे. मात्र यात आणखी दोन टक्क्यांची भर पडणार असून हा भत्ता 55 टक्क्यांपर्यंत जाणार आहे.
ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहणार आहे, म्हणजेच जानेवारी ते जून या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून महागाई भत्ता वाढीसोबतच राज्य कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढीचा सुद्धा फायदा मिळणार आहे.
जुलै महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ लागू होत असते. यंदा जुलै महिन्यात डी.ए वाढीचा निर्णय अपेक्षित आहे आणि त्यानंतर मग वार्षिक वेतनवाढ लागू होणार आहे. म्हणजेच जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढ अन वार्षिक वेतन वाढ असे दुहेरी आर्थिक लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.