सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ! ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना जाहीर झाला दिवाळी बोनस, कोणाला अन किती लाभ मिळणार ?

केंद्रातील सरकारच्या या निर्णयाने हजारो कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधी बोनस मिळेल आणि त्यांची दिवाळी गोड होईल अशी आशा आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या तीस दिवसांच्या पगारा एवढा बोनस दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Published on -

7th Pay Commission : नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेल्वे विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस ची घोषणा केली होती. यानुसार यंदाच्या दिवाळीत रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 78 दिवसांचा पगार दिला जाणार आहे.

दिवाळीच्या आधीच ही रक्कम संबंधित नोकरदार मंडळीच्या खात्यात जमा होणार हे विशेष. दरम्यान, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस बाबत एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.

सरकारने आपल्या काही कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस ची मोठी घोषणा केली आहे. वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने काही केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गैर-उत्पादकता लिंक्ड बोनस (ॲड हॉक बोनस) देण्याची घोषणा केली आहे.

केंद्रातील सरकारच्या या निर्णयाने हजारो कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधी बोनस मिळेल आणि त्यांची दिवाळी गोड होईल अशी आशा आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या तीस दिवसांच्या पगारा एवढा बोनस दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबतचे आदेश वित्त विभागाकडून नुकतेच निर्गमित झाले असून सदर आदेशानुसार या दिवाळी बोनस साठी गट ‘क’ आणि गट ‘ब’ अराजपत्रित कर्मचारी पात्र ठरणार आहेत. जे कोणत्याही उत्पादकता-लिंक्ड बोनस योजनेचा भाग नाहीत अशा कर्मचाऱ्यांना या अंतर्गत बोनस मिळणार आहे.

तसेच, बोनसची गणना करण्यासाठी वापरला जाणारा कमाल मासिक पगार हा 7,000 रुपये एवढा असणार आहे. हा बोनस केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या वेतन रचनेनुसार लागू होईल.

मात्र या बोनसचा लाभ अशाच कर्मचाऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी वर्षभरात 180 दिवस काम केलेले आहे. अर्थातच ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती वर्षभरात 180 दिवसांची आहे अशाच कर्मचाऱ्यांना या बोनसचा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe