सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही

सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर, सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणारे सरकारी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून नव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत. 

Published on -

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी महिन्यात मोठी भेट दिली. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. या निर्णयामुळे देशभरातील सातव्या वेतन आयोगातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

कारण की नवा आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सातवा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. नव्या आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर पेन्शन धारकांचा पगार सुद्धा वाढणार आहे.

सध्याचा सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू झाला होता आणि दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत असतो यामुळे नवीन आठवा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे.

सातव्या वेतन आयोगातील लाखो कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचा फायदा मिळणार आहे मात्र असेही काही विभाग आहेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या आठव्या वेतन आयोगाचा फायदा मिळणार नाही. अशा परिस्थितीत आज आपण नवीन आठवा वेतन आयोग कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही याची माहिती जाणून घेणार आहोत.

या विभागातील कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही नवीन वेतन आयोग

1 जानेवारी 2026 पासून लागू होणारा नवा आठवा वेतन आयोग देशातील काही सरकारी विभागांमधील कर्मचाऱ्यांना लागू होणार नसल्याची बातमी मीडिया रिपोर्ट मधून समोर आले आहेत. खरे तर 1946 मध्ये पहिल्यांदा वेतन आयोग लागू करण्यात आला.

1946 मध्ये पहिला वेतन आयोग लागू झाल्यानंतर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे. 2006 मध्ये सहावा वेतन आयोग लागू झाला होता. तसेच 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला आणि आता 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे.

दरम्यान, जे कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) किंवा कोणत्याही स्वायत्त संस्थेचे कर्मचारी आहेत किंवा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नसल्याची माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे. खरे तर या संबंधित विभागातील कर्मचारी वेतन आयोगाच्या कक्षे बाहेरील आहेत.

म्हणजे या लोकांना वेतन आयोग लागू होत नसतो. कारण या संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आणि भत्त्यासाठी वेगळे नियम तयार करण्यात आले आहे जे की वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांपेक्षा वेगळे आहेत. हेच कारण आहे की, या संबंधित विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना नवा 8 वा वेतन आयोग लागू होणार नाहीये.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe