7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तथा पेन्शन धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची अन आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील मोदी सरकारने त्यांचे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के केला होता. लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मार्च महिन्यात याचा शासन निर्णय मोदी सरकारने जाहीर केला.
या निर्णयानुसार जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के एवढा झाला. आधी महागाई भत्ता 46 टक्के होता म्हणजेच महागाई भत्तामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली. केंद्रातील सरकारने निर्णय घेतल्यानंतर देशातील अनेक राज्य सरकारांनी त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला.
मात्र महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला गेला नव्हता. यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तथा पेन्शनधारकांमध्ये वर्तमान शिंदे सरकार विरोधात मोठी नाराजगी पाहायला मिळाली.
पण, राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे विचाराधीन होता. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि नंतर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता यामुळे याबाबतचा शासन निर्णय काढता येत नव्हता.
आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता संपली आहे. यामुळे महागाई भत्ता वाढीच्या प्रस्तावावर महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने सकारात्मक असा निर्णय घेतला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे.
शिंदे सरकारने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज अर्थातच 10 जुलै 2024 ला निर्गमित झाला आहे.
या सदर शासन निर्णयानुसार आता राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून 50 टक्के दराने महागाई भत्ता लागू राहणार आहे. महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून लागू होईल मात्र याचा रोख लाभ हा जुलै महिन्याच्या पगारांसोबत मिळणार आहे.
अर्थातच जानेवारी ते जून या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची देखील रक्कम राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. खरे तर, गेल्या अनेक दिवसांपासून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
दरम्यान, आज राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यामुळे सदर नोकरदार मंडळीला मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.
वाढत्या महागाईने बेजार झालेल्या सरकारी नोकरदार मंडळीला वाढीव महागाई भत्ता मुळे थोडा का होईना पण दिलासा मिळणार आहे, अन यामुळे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.