7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता.
महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका करण्यात आला आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा डीए वाढीचा लाभ मिळतो. पहिला लाभ जानेवारी महिन्यात आणि दुसरा लाभ जुलै महिन्यात मिळतो.

2025 मध्ये जानेवारी महिन्याची महागाई भत्ता वाढीची घोषणा मार्च महिन्यात करण्यात आली होती आणि आता जुलै महिन्याच्या महागाई भत्ता वाढीची घोषणा ऑक्टोबर महिन्याच्या आसपास होईल अशी आशा आहे. महागाई भत्ता वाढ एआयसीपीआयच्या आकडेवारीवरून ठरवली जात असते.
अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या 6 महिन्यांच्या आकडेवारीवर जानेवारी ते जून या कालावधीमधील आकडेवारीनुसार जुलै महिन्यापासूनचा आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीच्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यापासून चा महागाई भत्ता निश्चित होत असतो. जानेवारी ते जून 2025 या काळातील आकडेवारीनुसार आता जुलै 2025 पासून चा महागाई भत्ता निश्चित होणार आहे.
किती वाढणार महागाई भत्ता?
मागच्या वेळी महागाई भत्ता दोन टक्के वाढला होता मात्र यावेळी महागाई भत्त्यात चांगली वाढ होणार आहे. आतापर्यंत एआयसीपीआय निर्देशांक जानेवारीमध्ये 143.2, फेब्रुवारीमध्ये 142.8, मार्चमध्ये 143.0, एप्रिलमध्ये 143.5 आणि मे महिन्यात 144.0 वर होते.
जे 3 % DA स्कोर दर्शविते. तथापि, जूनची आकडेवारी समोर येणे बाकी आहे. 31 जुलै नंतर ही आकडेवारी समोर येणार आहे. जुलैमध्ये देखील ही आकडेवारी अशीच वाढत राहिली तर यावेळी महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढू शकतो असे बोलले जात आहे.
जर जूनमध्ये हीच आकडेवारी कायम राहिली तर तीन टक्के महागाई भत्ता वाढ फिक्स आहे. म्हणजेच महागाई भत्ता एक तर 58% होईल किंवा 59% होईल.
कशी असेल पुढील कार्यवाही?
जानेवारी ते जून या कालावधीत एआयसीपीआय आयडब्ल्यू निर्देशांकाचा डेटा जुलैच्या अखेरीस येईल. हे निर्देशांक समोर आल्यानंतर प्रत्यक्षात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार हे फिक्स होणार आहे. दरम्यान निर्देशांक समोर आल्यानंतर त्याची फाईल लेबर ब्युरो वित्त मंत्रालयाकडे पाठवणार आहे.
मग वित्त मंत्रालयाकडून महागाई भत्ता वाढी बाबतचा प्रस्ताव तयार होईल आणि हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाईल. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा झेंडा मिळाल्यानंतर मग प्रत्यक्षात त्या महिन्यापासून महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.
पण ही वाढ जुलै महिन्यापासूनचं लागू राहील म्हणजे जेव्हाकेव्हा ही वाढ प्रत्यक्षात लागू केली जाईल तेव्हा महागाई भत्ता फरकाची सुद्धा रक्कम मिळणार आहे. जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढी बाबतचा शासन निर्णय साधारणतः दसऱ्याच्या सुमारास जारी होतो. यंदाही सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये याबाबतचा शासन निर्णय निघू शकतो.