अखेर कन्फर्म झालंच ! जुलै 2024 पासून 4% नाही तर ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता, AICPI ची नवीन आकडेवारी समोर

7th Pay Commission : महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी 2024 पासूनचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. यानुसार संबंधित नोकरदार मंडळीला 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे.

खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एका वर्षात दोनदा सुधारित होत असतो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून महागाई भत्ता रिवाईज होत असतो.

यानुसार 2024 मधील महिन्यापासून चा महागाई भत्ता रिवाईज करण्यात आला असून जुलै पासूनची सुधारणा बाकी आहे. महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढ ए आय सी पी आय च्या आकडेवारीनुसार ठरवली जात असते.

जुलै महिन्यापासून DA किती वाढणार हे एआयसीपीआयच्या जानेवारी ते जून या कालावधीमधील आकडेवारीनुसार स्पष्ट होणार आहे. पण, आतापर्यंत जानेवारी ते में या कालावधीमधील AICPI ची आकडेवारी समोर आली आहे.

अजून जून महिन्याची आकडेवारी येणे बाकी आहे. यामुळे ही आकडेवारी कधी जाहीर होणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. आत्तापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पुढील महागाई भत्ता वाढ किती टक्क्यांनी वाढणार याबाबत अंदाज वर्तवला जाऊ लागला आहे. 

किती वाढणार DA ?

जानेवारीमध्ये एआयसीपीआय इंडेक्सचा आकडा 138.9 वर होता. यात महागाई भत्ता वाढून 50.84 टक्के झाला. यानंतर फेब्रुवारीमध्ये इंडेक्स 139.2, मार्चमध्ये 138.9, एप्रिलमध्ये 139.4 आणि मेमध्ये 139.9 वर पोहचला आहे.

या पॅटर्ननुसार मे मध्ये महागाई भत्ता 52.91 इतका झाला आहे. विशेष म्हणजे जून महिन्याची आकडेवारी आल्यानंतर यामध्ये आणखी थोडीशी वाढ होणार आहे. मात्र असे असले तरी यावेळी महागाई भत्ता हा फक्त तीन टक्क्यांनी वाढणार अशी शक्यता आहे.

कारण की DA 4% होण्यासाठी एआयसीपीआयचा इंडेक्स 143 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. पण, सध्याची आकडेवारी पाहिली तर असे होणे अशक्य आहे. म्हणून जुलै महिन्यापासून महागाई भत्ता फक्त तीन टक्क्यांनी वाढणार असे बोलले जात आहे.

खरेतर गेल्या दोन वर्षांच्या काळात सातत्याने महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढत राहिला आहे. पण जुलै महिन्यापासून महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला तर दोन वर्षात पहिल्यांदाच महागाई भत्तामध्ये एवढी कमी वाढ होणार आहे.

याबाबतचा निर्णय हा सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतला जाईल अशी शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये निर्णय झाला तर त्याच महिन्याच्या पगारा सोबत महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम सदर नोकरदार मंडळीला मिळणार आहे.