7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याची शक्यता आहे. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 31 मार्च 2024 ला होणार होता.मात्र 31 मार्चला मार्च एंडिंग असल्याने पगार हा उद्याच होईल असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये होत आहे.
विशेष म्हणजे या पगारासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव पगार देखील मिळणार आहे.महागाई भत्ता आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील या महिन्याच्या पगारांसोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचे जाहीर केले होते. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीचे केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याचा मोठा निर्णय घेतला.
जानेवारी 2024 पासून ही महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली. परंतु यांचा रोख लाभ मार्च महिन्याच्या पगारांसोबत दिला जाईल असे त्यावेळी सरकारने स्पष्ट केले होते.
यानुसार आता मार्च महिन्याच्या पगारांसोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता मिळणार असून जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात यावेळी जमा केली जाणार आहे.
एवढेच नाही तर महागाई भत्ता 50% झाला असल्याने आता घर भाडे भत्ता देखील एक टक्क्यांपासून ते तीन टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. घर भाडे भत्ता शहरानुसार दिला जात असतो.
यामध्ये एक्स कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांना 27%, वाय कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना 18% आणि झेड कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांना 9% एवढा घर भाडे भत्ता आत्तापर्यंत मिळत होता. आता मात्र हा घरबाडे भत्ता एक्स, वाय आणि झेड कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के आणि दहा टक्के असा दिला जाणार आहे.
महागाई भत्ता किती वाढणार
ज्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन दरमहा 45,700 रुपये असेल त्याला आता 22 हजार 850 रुपये एवढा महागाई भत्ता मिळणार आहे. यापूर्वी हा भत्ता 21,022 रुपये होता.
म्हणजे आधीच्या तुलनेत आता 1,818 रुपये अधिक महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजेच वार्षिक अधारावर 21 हजार 816 एवढी महागाई भत्ता वाढ होणार आहे.
घर भाडे भत्ता किती वाढणार
Y श्रेणी शहरात राहणाऱ्या ज्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 45,700 रुपये असेल त्याला आता 20% नुसार 9140 रुपये एवढा एचआरए मिळणार आहे. आधी हा भत्ता 8226 रुपये एवढा होता. म्हणजेच आता दर महिन्याला पूर्वीपेक्षा 914 रुपये अधिक HRA मिळणार आहे.