सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! जानेवारी महिन्यापासून ‘हे’ 3 आर्थिक लाभ लागू होणार, पगारात किती वाढ?

Published on -

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या महिन्यात कर्मचाऱ्यांना एकूण 3 आर्थिक लाभ मिळणार आहेत. यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार

असून आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून कोणते 3 आर्थिक लाभ लागू होतील याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

यामुळे जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी नोकरीत असेल तर आजची ही बातमी तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत वाचायला हवी.

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट होणार 

आठवा वेतन : सरकार 2028 च्या सुरुवातीला नवीन वेतन आयोग लागू करेल. पण नवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून प्रभावी राहू शकतो.

असे झाल्यास नव्या वेतन आयोगाची थकबाकी सुद्धा कर्मचाऱ्यांना त्यावेळी दिली जाईल. म्हणजेच जानेवारी 2026 पासून प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. 

DA Hike : सरकारी नोकरदार मंडळीला या वर्षातील पहिली महागाई भत्ता वाढ जानेवारी 2026 पासून लागू केली जाणार आहे.

केंद्र सरकारने जोवर आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होत नाही तोपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असे जाहीर केले आहे. यानुसार जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ मंजूर होणार आहे.

सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता मिळत असून यामध्ये येत्या काळात तीन ते पाच टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.

अर्थात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 61 टक्के किंवा 63% इतका होऊ शकतो. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय मार्च महिन्यात होळी सणाच्या आसपास जारी होईल. मात्र ही वाढ जानेवारी 2026 पासून लागू राहील.

DA थकबाकी : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन ते पाच टक्क्यांनी वाढणार असा अंदाज एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार समोर येत आहे. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू राहणार

असून याचा प्रत्यक्ष लाभ मार्च महिन्यात मिळणार असल्याने त्यांना थकबाकीचा पण लाभ मिळेल. मार्च महिन्यात अधिकृत शासन निर्णय जारी झाल्यानंतर त्या महिन्याच्या पगारा सोबत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ आणि दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे.  

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe