महाराष्ट्रातील 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट ! महागाई भत्ता (DA) 55% करण्याबाबतचा शासन निर्णय ह्या तारखेला जाहीर होणार

राज्य शासकीय सेवेत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक मोठी बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे राज्यातील 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शन धारकांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात.

Published on -

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी रक्षाबंधनाच्या आधीच मोठी भेट मिळणार असल्याचे बातमी मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे.

दरम्यान रक्षाबंधनाचा सण साजरा होण्याआधीच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार अशी बातमी समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात दोन टक्के महागाई भत्ता वाढीची भेट मिळाली.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका करण्यात आला आणि ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू झाली. यानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना देखील महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई सवलतीचा लाभ मिळणे आवश्यक आहे. 

राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय कधी होणार ?

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा 55% इतका होणे अपेक्षित आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळतोय म्हणजेच यामध्ये दोन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जून 2025 ते 18 जुलै 2025 या काळात संपन्न झाले. या पावसाळी अधिवेशनाच्या काळात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय होऊ शकतो असा दावा करण्यात आला होता.

मात्र पावसाळी अधिवेशनात देखील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची प्रचंड निराशा झाली असून महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय नेमका कधी निघणार असा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जातोय.

एकीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या जुलै 2025 पासून च्या महागाई भत्ता वाढीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही जानेवारी 2025 पासूनचा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत नाहीये.

मात्र आता मीडिया रिपोर्ट मध्ये 31 जुलै 2025 पर्यंत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाईल असा दावा करण्यात आला आहे. 

महागाई भत्ता फरकाचाही लाभ मिळणार 

सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता लागू आहे. मात्र जुलै च्या शेवटच्या आठवड्यात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला जाईल म्हणजेच महागाई भत्ता 55% इतका होणार आहे.

याबाबतचा शासन निर्णय जुलै महिन्यात होणार असला तरी देखील ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहील. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!