7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर, सध्याच्या सातव्या वेतन आयोग अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना पगारांसमवेतच वेगवेगळे भत्ते सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे.
सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी सुद्धा सरकारकडून मदत दिली जाते. घर बांधण्यासाठी सरकारकडून हाऊस बिल्डिंग अलाउन्स म्हणजेच एचबीए दिला जातो. हाऊस बिल्डिंग अलाउन्स अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना कमी व्याजदरात होमलोन पुरवले जाते.

यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे घराचे स्वप्न सहजतेने पूर्ण होत आहे. दरम्यान, केंद्रातील सरकारने जानेवारी महिन्यात नवीन आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून येत्या काही दिवसांनी नव्या वेतन आयोगाची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू होणार आहे.
त्यामुळे नव्या वेतन आयोगात हाऊस बिल्डिंग अलाउन्स मध्ये बदल होणार का, हाऊस बिल्डिंग अलाऊंडची रक्कम वाढवली जाणार का? असे काही प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात असून आज आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सातवा वेतन आयोग अंतर्गत किती HBA मिळतो?
सध्याच्या सातवा वेतन आयोगाच्या नियमानुसार, कोणताही केंद्र सरकारी कर्मचारी घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी HBA घेऊ शकतो. कर्जाची कमाल रक्कम 25 लाख रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना 34 महिन्याच्या मूळ पगारा इतकी रक्कम हाऊस बिल्डिंग अलाउन्स म्हणून दिली जाते. जी की कमाल पंचवीस लाख रुपयांपर्यंत असू शकते. यापेक्षा जास्त रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी मिळत नाही. तसेच या रकमेसाठी सध्या 7.44% एवढा व्याजदर लागू आहे.
दरम्यान 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होणार असून या नव्या वेतन आयोगात हाऊस बिल्डिंग अलाउन्स मध्ये बदल होण्याची शक्यता असून हाऊस बिल्डिंग अलाउन्स अंतर्गत जी रक्कम मिळते त्यामध्ये आगामी वेतन आयोगात वाढ सुद्धा होऊ शकते.
आठवा वेतन आयोगात HBA किती वाढणार?
एक जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होणार असून 31 डिसेंबर 2025 रोजी सध्याचा सातवा वेतन आयोग समाप्त होईल. दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो यानुसार एक जानेवारी 2026 पासून नवा आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे कारण की सध्याचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी 2016 पासून कार्यान्वित आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सहाव्या वेतन आयोग अंतर्गत हाऊस बिल्डिंग अलाउन्स फक्त साडेसात लाख रुपये एवढा होता. म्हणजेच सहाव्या वेतन आयोग अंतर्गत कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग अलाउन्स म्हणून घर बांधण्यासाठी साडेसात लाख रुपये एवढे कर्ज दिले जात होते.
मात्र सातवा वेतन आयोग लागू झाला आणि ही रक्कम सुद्धा वाढली. सातव्या वेतन आयोगातून घर बांधण्यासाठी हाऊस बिल्डिंग अलाउन्स म्हणून 25 लाख रुपये दिले जात आहेत आणि यासाठी 7.44% इतका व्याजदर लागू आहे.
दरम्यान, आता आठव्या वेतन आयोगात हाऊस बिल्डिंग अलाउन्स किती मिळणार हा मोठा प्रश्न आहे. परंतु काही प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये आठव्या वेतन आयोगात हाऊस बिल्डिंग अलाउन्स 40 ते 50 लाख रुपये एवढा केला जाऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे.