सातवा वेतन आयोग अंतिम टप्प्यात सरकारी कर्मचाऱ्यांना देणार दणका ! ‘या’ कारणामुळे पगाराचा आकडा कमी होण्याची शक्यता

सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे आणि त्या आधीच सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी हाती आली आहे. सातवा वेतन आयोगाच्या शेवटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी होऊ शकतो असे वृत्त हाती आले आहे.

Published on -

7th Pay Commission : सध्या देशात सर्वत्र आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आणि त्या दिवसापासूनच नव्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत.

खरे तर, सध्याचा सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 मध्ये लागू झाला आणि तेव्हापासून देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदी लागू आहेत. पण वेतन आयोग दर 10 वर्षांनी बदलतो या समीकरणांनुसार आता सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी संपेल आणि त्यानंतर 1 जानेवारी 2026 पासून नवा आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे.

म्हणजे सातवा वेतन आयोग आता अंतिम टप्प्यात आला आहे. पण सातवा वेतन आयोग अंतिम टप्प्यात असतानाच सरकारी कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आणि ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू झाली. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू झालेली ही महागाई भत्ता वाढ जानेवारी ते जून या कालावधीसाठी राहणार आहे.

म्हणजेच जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीत पुन्हा एकदा महागाई भत्ता परत वाढणार आहे. पण सध्याची स्थिती पाहता म्हणजे 2025 च्या पहिल्या तिमाहीतील आकडेवारीनुसार महागाई भत्त्यात आगामी काळात अपेक्षित वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचं स्पष्ट होत आहे अन यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारवाढ जागीच थांबणार आहे.

मागील घोषणेनुसार महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ झाली आणि DA 55 टक्क्यांवर पोहोचला. मात्र, आता पुढील वाढ केवळ 2 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे, एवढेच नाही तर काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये पुढील महागाई भत्ता वाढ दोन टक्क्यांपेक्षा कमी सुद्धा राहू शकते असेही बोलले जात आहे.

ज्यामुळे जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीत कर्मचाऱ्यांची मोठी निराशा होऊ शकते. यामुळे त्यांच्या पगाराचा आकडा कमी होणार आहे. आणि म्हणूनच सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये थोडीशी नाराजी सुद्धा आहे. खरेतर, पुढील महागाई भत्ता वाढ म्हणजेच जुलै महिन्यापासून लागू होणारी महागाई भत्ता वाढ सातव्या वेतन आयोगाअंतर्गत अखेरची महागाई भत्ते वाढ राहणार असा अंदाज आहे.

जसं की तुम्हाला ठाऊकच आहे की सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे, त्यानंतर मग नव्या आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होतील. दरम्यान, नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याच्या आधीच AICPI-IW या सूचकांकातील घसरणीमुळे महागाई भत्त्यात फारशी वाढ होणार नाही असे चित्र दिसत आहे.

खरेतर, महागाई भत्ता वाढ एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असते आणि याच आकडेवारीत फेब्रुवारीमध्ये 0.4 टक्क्यांची घट झाली. यामुळे पुढील महागाई भत्ता वाढ फारच किरकोळ होईल असे चित्र दिसत असून त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आता वेतनवाढीसाठी आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष ठेवावे लागणार की काय असे वाटू लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News