7th Pay Commission : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अलीकडेच मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना बोनस मंजूर करण्यात आला आहे. बीएमसी आयुक्तांनी मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना 31 हजार रुपये बोनस देण्याचा मोठा निर्णय घेतला असून याबाबतचे अधिकृत परिपत्रक सुद्धा आजारी झाले आहे.
खरे तर मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना 51 हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात सरकारने मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना फक्त 31 हजार रुपये बोनस मंजूर केला असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी सुद्धा आहे.

2024 च्या दिवाळीत बीएमसी च्या कर्मचाऱ्यांना 29 हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळाला होता. यावेळी मात्र कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये अतिरिक्त बोनस देण्यात आला असून यामुळे काही कर्मचाऱ्यांनी नक्कीच समाधान व्यक्त केले असून या बोनसच्या रकमेमुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदाही उत्साहात साजरा होईल अशी आशा आहे.
दरम्यान, आता मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पाठोपाठ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याचा पगार लवकर दिला जाणार आहे.
ऑक्टोबर महिन्याचा पगार हा नोव्हेंबर मध्ये मिळणे अपेक्षित होते. मात्र दिवाळीच्या निमित्ताने ऑक्टोबरचा पगार ऑक्टोबरमध्येचं देण्यात यावा असे निर्देश शासनाकडून जारी झाले आहेत. यावर्षी दिवाळी 22 ऑक्टोबर पासून सुरु होणार असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना याआधीच ऑक्टोबरचे वेतन मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
आगाऊ वेतन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून लवकरच अधिकृत शासन निर्णय जारी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नक्कीच दिवाळीआधी ऑक्टोबरचा पगार मिळाला तर सणासुदीच्या दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांना पैशांची तंगी भासणार नाही यामुळे या निर्णयाचे स्वागत होत आहे.