7th Pay Commission : या नवीन वर्षाच्या सुरुवातीला केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची भेट दिली. जानेवारी महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून आता नव्या वेतन आयोगाच्या समितीची लवकरच स्थापना होणार आहे.
आता लवकरच नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांच्या आणि सदस्यांची नियुक्ती होणार आहे. खरे तर सध्याचा सातवा वेतन आयोग हा एक जानेवारी 2016 ला लागू झाला. वेतन आयोग प्रत्येक दहा वर्षांनी बदलत असतो यानुसार एक जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे.

दरम्यान पुढील वर्षी नव्या आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण सध्याच्या सातव्या वेतन आयोग अंतर्गत 40 हजार, 50,000 आणि 75 हजार रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नव्या आठव्या वेतन आयोगात किती पगार मिळणार? याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
फिटमेंट फॅक्टर नुसार ठरणार पगार वाढ
सध्याच्या सातव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा फिटमेंट फॅक्टरनुसार ठरला होता. सातव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 एवढा होता. आता नव्या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती वाढणार ? यावरूनच सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ठरणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार नव्या आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना 2.86 ते 3 टक्क्यांपर्यंत वाढणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता आपण जर नव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 एवढा झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार? याचे कॅल्क्युलेशन समजून घेणार आहोत.
चाळीस हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ?
जर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याचे मूळ वेतन सध्याच्या सातवा वेतन आयोग अंतर्गत 40 हजार रुपये इतके असेल तर सध्या त्याचे वेतन हे 1,02,800 रुपये असेल आणि नव्या आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा पगार 40,000×2.86 = 1,14,400 इतका होणार आहे. म्हणजेच नव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा पगार 11 हजार 600 रुपयांनी वाढणार आहे.
50,000 पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?
मिळालेल्या माहितीनुसार ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे 50 हजार रुपये असेल तर त्या व्यक्तीला सध्याच्या वेतन आयोगातून एक लाख 28 हजार रुपये इतका पगार मिळतोय. पण नव्या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 एवढा होणार आहे आणि एकूण पगारामध्ये 50,000 × 2.86 = एक लाख 43 हजार रुपये इतका पगार मिळणार आहे म्हणजेच पगारात 15 हजाराची वाढ होणार आहे.
75 हजार मुळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?
जर सध्याच्या सातव्या वेतन आयोगात एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन हे 75 हजार रुपये असेल तर त्याला एकूण 1,92,750 इतकां पगार मिळत असेल. पण आता नवीन आठवा वेतन आयोग लागू झाला तर त्यांचा पगार 75,000 × 2.86 = 2,14,500 इतका होणार आहे. म्हणजे संबंधित कर्मचाऱ्यांचा पगारात 19,750 रुपयांची वाढ होणार आहे.