7th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच एक मोठी भेट मिळणार आहे. खरंतर जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे.
यामुळे नवीन आठवा वेतन आयोग कधीपर्यंत स्थापित होणार हा मोठा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असल्याने 1 जानेवारी 2026 पासून नव्या आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी शक्य असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय.

असे असतानाच आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत एक नवी अपडेट हाती आली आहे. जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणारे या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
यावेळी किती वाढणार महागाई भत्ता
मार्च 2025 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या वाढीनंतर 55 टक्क्यांवर पोहोचला आहे आणि ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली आहे.
खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो पहिली महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून होते आणि दुसरी वाढ जुलै महिन्यापासून होते.
त्यानुसार आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार याबाबत नवीन माहिती हाती आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जुलै महिन्यापासून चा महागाई भत्ता किती वाढणार हे सर्वस्वी एआयसीपीआयच्या जानेवारी ते जून 2025 या कालावधी मधील आकडेवारीनुसार निश्चित होणार आहे.
सध्या ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स (AICPI) च्या जानेवारी ते एप्रिल 2025 दरम्यानची आकडेवारी समोर आली आहे. यानुसार, महागाई भत्ता (DA) 57.47% पर्यंत पोहोचला आहे. महत्त्वाचे बाब म्हणजे मे आणि जुन या दोन महिन्यांची आकडेवारी येणे अजून बाकी आहे.
पण, सध्याच्या ट्रेंडनुसार जुलै 2025 मध्ये महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना 55% महागाई भत्ता मिळतो आहे.
दरम्यान, एप्रिलपर्यंतच्या आकड्यांवरून हे स्पष्ट होते की DA आता 57% चा टप्पा पार करत आहे. जर मे आणि जून 2025 मध्येही हा ट्रेंड कायम राहिला, तर जुलैपासून DA 58% होणे निश्चित मानले जात आहे.
शासन निर्णय कधी होणार
जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीचा जीआर म्हणजेच शासन निर्णय सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये घेतला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
जून महिन्याचा आकडा जुलै अखेरीस येतो आणि त्यानंतर प्रक्रिया सुरू होते म्हणून याबाबतचा निर्णय सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही वाढ जुलै महिन्यापासूनच लागू राहणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे.