सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढणार ! 18 हजार, 25 हजार आणि 35 हजार पगार असणाऱ्यांचा पगार किती वाढणार?

Published on -

7th Pay Commission : सातवा वेतन आयोगातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे महागाई भत्ता वाढी संदर्भात. खरंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. पहिल्यांदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यात वाढतो आणि त्यानंतर जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते.

यानुसार मार्च 2025 मध्ये जानेवारी 2025 पासून चा महागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे. जानेवारी 2025 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढला आहे.

जानेवारीपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 55 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. यानंतर आता जुलै महिन्यापासून देखील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई दोन किंवा तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अशा परिस्थितीत आता आपण जुलै महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी किंवा तीन टक्क्यांनी वाढल्यानंतर 18 हजार, 25,000 आणि 35000 पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी कितीने वाढ होणार याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत. 

अठरा हजार पगार असणाऱ्यांच्या पगारात कितीने वाढ होणार 

अठरा हजार बेसिक पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्याच्या 55 टक्के दराने 9900 रुपये इतका महागाई भत्ता मिळतोय मात्र जेव्हा महागाई भत्ता 57% इतका होईल तेव्हा त्यांना दहा हजार 260 रुपये मिळणार आहेत. तसेच जर महागाई भत्ता 58% इतका झालात तर या संबंधित कर्मचाऱ्यांना दहा हजार 440 रुपये मिळणार आहेत.

25,000 पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? 

25 हजार बेसिक पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्याच्या 55 टक्के दराने 13,750 रुपये इतका महागाई भत्ता मिळतोय. मात्र जेव्हा महागाई भत्ता 57% इतका होईल तेव्हा त्यांना 14 हजार 250 रुपये मिळणार आहेत. तसेच जर महागाई भत्ता 58% इतका झालात तर या संबंधित कर्मचाऱ्यांना 14 हजार 500 रुपये मिळणार आहेत. 

35 हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?

35 हजार बेसिक पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्याच्या 55 टक्के दराने 19,250 रुपये इतका महागाई भत्ता मिळतोय. मात्र जेव्हा महागाई भत्ता 57% इतका होईल तेव्हा त्यांना 19 हजार 950 रुपये मिळणार आहेत. तसेच जर महागाई भत्ता 58% इतका झालात तर या संबंधित कर्मचाऱ्यांना 20 हजार 300 रुपये मिळणार आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!