सरकारी कर्मचाऱ्यांनो, 7 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर कसा ठरला होता ? पुढील वेतन आयोगात काय होणार

सध्या सगळीकडे आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा आहेत. नव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार, पगार किती वाढणार अशा असंख्य चर्चा सध्या सुरू आहेत. दरम्यान आज आपण सध्याच्या सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर कसा निश्चित झाला याची माहिती पाहणार आहोत.

Updated on -

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. जानेवारी महिन्यात ही घोषणा झाली असून लवकरच आठवा वेतन आयोग आपले कामकाज सुरू करणार आहे.

अजून आठवा वेतन आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती झालेली नाही मात्र लवकरच हे काम पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर आठव्या वेतन आयोगाच्या पॅनल कडून प्रत्यक्षात कामकाज सुरू होण्याची आशा आहे.

फिटमेंट फॅक्टर किती राहणार?

यामुळे सध्या सर्वत्र आठवा वेतन आयोगाच्या चर्चा असून आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर काय बदल होणार याबाबत जाणून घेण्याची कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता सुद्धा आहे. नव्या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती राहणार? हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय.

एवढेच नाही तर सध्याच्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर कसा ठरला होता याबाबतही कर्मचाऱ्यांना जाणून घ्यायचे आहे. दरम्यान आज आपण सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर कसा ठरला होता याचा एक आढावा घेणार आहोत. 

कसा ठरला होता फिटमेंट फॅक्टर

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार 2014 मध्ये स्थापित झालेल्या सातव्या वेतन आयोगाच्या समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ठरवताना 2.57 फिटमेंट फॅक्टरचा अवलंब करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे आयोगाने लागू केलेला हा फॅक्टर फक्त सरळ पद्धतीने वेतनवाढीसाठी नव्हता, तर त्यामागे सखोल अभ्यास सुद्धा झालेला होता.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की याआधी 6 व्या वेतन आयोगात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 7000 इतके निश्चित करण्यात आलेले होते. दरम्यान याच किमान वेतनाला 2.57 ने गुणुन किमान वेतन निश्चित करण्यात आले.

अशा तऱ्हेने किमान वेतन 18,000 ठरवण्यात आले. पण हा फिटमेंट फॅक्टर ठरवताना वेतनवाढीमागे 15व्या इंडियन लेबर कॉन्फरन्स (1957) च्या मार्गदर्शक तत्वांचा सुद्धा आधार घेतला गेला होता. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळी आयोगाने एका तीन सदस्यांच्या कुटुंबाच्या दरमहा गरजांचा अभ्यास केला.

महिन्याला किती खर्च

या अभ्यासात एका कुटुंबाला महिन्याला किती खर्च करावा लागतो याचा सखोल अभ्यास झाला होता. या अभ्यासात असे निदर्शनास आले होते की एका कुटुंबाला अन्न, भाजीपाला, दूध, फळे, डाळी, साखर यासाठी दरमहा 9217.99 रुपये लागतात. तसेच इंधन, वीज, पाणी यासाठी 2304.50 रुपये लागतात. शिक्षणासाठी जवळपास 3388.97 रुपये लागतात,

सण-समारंभ यासाठी 2033.38 रुपये लागतात आणि घरभाडे म्हणून 524.07 रुपये लागतात असे या अभ्यासातून समोर आले होते. म्हणजेच एका तीन सदस्य कुटुंबाला महिन्याचा खर्च म्हणून जवळपास 17,468.91 रुपये लागतात असे या अभ्यासातून स्पष्ट झाले होते.

आठव्या वेतन आयोगात काय होणार ? 

दरम्यान यावर 125% महागाई भत्ता विचारात घेऊन 3% अतिरिक्त खर्च धरून अंतिम रक्कम 17,992.98 रुपये इतकी झाली आणि मग सरकारने ही रक्कम राउंड फिगर करून 18,000 रुपये इतके किमान वेतन निश्चित केले. अशा तऱ्हेने सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर ठरवण्यात आला होता.

आठव्या वेतन आयोगात सुद्धा याच पद्धतीने फिटमेंट फॅक्टर ठरवला जाणार आहे. पुढील वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा 1.92 ते 2.86 यादरम्यान ठेवला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. त्यामुळे आता आठव्या वेतन आयोगात काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News