7th Pay Commission HRA News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी फडणवीस सरकारने राज्यातील सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय 2025 मध्ये घेण्यात आला असला तरी देखील ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे.
अशातच, आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक गुड न्यूज समोर येत आहे ती म्हणजे राज्यातील काही वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव घर भाडे भत्त्याच्या फरकाची रक्कम मिळणार आहे. यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जुलै 2021 पासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता वाढवण्यात आला. घरभाडे भत्ता 24 टक्क्यांवरून सत्तावीस टक्के झाला. हि वाढ जुलै 2021 पासून लागू झालेली असली तरी देखील याचा निर्णय ऑक्टोबर 2021 मध्ये झाला अन तेव्हापासूनच वाढीव HRA चा रोख लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळतोय.
त्यावेळी राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधी मधील घर भाडे भत्ता फरकाची सुद्धा रक्कम मिळालेली होती. पण शालार्थ प्रणाली अंतर्गत शिक्षकांना शालार्थ मध्ये टॅब उपलब्ध नसल्याने सदर शिक्षकांना सदर कालावधीमधील थकबाकी अदा करण्यात आलेली नाही.
शालार्थ प्रणाली अंतर्गत येणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधी मधील घर भाडे भत्ता थकबाकी मिळालेले नाहीये. पण आता याच बाबत एक महत्त्वाचा निर्णय झाला असून तीन मार्च 2025 रोजी सरकारकडून महत्वाचे शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता थकबाकी देण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित केले असून लवकरच या संबंधित कर्मचाऱ्यांना आता थकबाकीची रक्कम मिळणार आहे.
यामुळे या संबंधित नोकरदार मंडळीला मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत असून संबंधितांच्या माध्यमातून लवकरात लवकर हा पैसा खात्यात वर्ग झाला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यामुळे आता घर भाडे भत्ता फरकाची रक्कम या कर्मचाऱ्यांच्या खात्यात नेमकी कधी जमा होणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.