7th Pay Commission : सातवा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे येत्या काही महिन्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची एक महत्त्वाची मागणी आता पूर्ण होणार आहे.
खरं तर जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील सरकारकडून आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली. तेव्हापासून आगामी आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत. आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी सरकारकडून वेगवान हालचाली सुद्धा सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आगामी आठवा वेतन आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नावे फायनल झाली आहेत आणि येत्या काही दिवसांनी नव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होण्याची शक्यता आहे.
दरम्यान आता आपण नवागतन आयोग कधीपासून लागू होणार आणि याअंतर्गत कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा पगार कितीने वाढणार याबाबत माहिती घेणार आहोत.
कधी लागू होणार नवीन वेतन आयोग?
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2006 मध्ये सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला. यानंतर दहा वर्षांनी म्हणजे 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला. तथापि सातव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना 2014 मध्ये झाली होती.
तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारने सातवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली होती. यानंतर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केला.
वेतन आयोग प्रत्येक दहा वर्षांनी लागू होत असतो यानुसार नवीन आठवा वेतन आयोग 2026 मध्ये लागू होणार आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग एप्रिल डिसेंबर 2025 रोजी समाप्त होईल आणि एक जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे.
याचा लाभ जवळपास एक कोटीहुन अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना होणार आहे. केंद्रातील सरकारकडून सुरुवातीला आठवा वेतन आयोग लागू केला जाईल आणि यानंतर विविध राज्यांमधील राज्य सरकार हा नवा वेतन आयोग लागू करणार आहेत.
आठव्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार?
मीडिया रिपोर्ट नुसार आठवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 वरुन 2.86 पर्यंत वाढू शकतो. मात्र याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही पण मीडिया रिपोर्ट मध्ये अशी शक्यता वर्तवण्यात आले आहे. जर समजा फिटमेंट फॅक्टर 2.86 इतका झाला तर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 186 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
सध्याच्या सातव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 18 हजार रुपये इतका आहे मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात हा किमान मूळ पगार 51 हजार 480 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.