7th Pay Commission : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता येत्या काही दिवसात वाढवला जाणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना सध्या 50% दराने महागाई भत्ता मिळत असून यामध्ये तीन टक्के दराने वाढ होणे अपेक्षित आहे.
म्हणजेच महागाई भत्ता 53% होणार असून ही वाढ जुलै 2024 पासून लागू होणार आहे. याबाबतचा निर्णय हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर होऊ शकतो असा एक अंदाज आहे. महागाई भत्ता 53% झाल्यानंतर घर भाडे भत्ता देखील वाढणार आहे.
दरम्यान याच संदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्य शासनांस, राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रति सादर करण्यात आले आहे.
सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार राज्य कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता व इतर देय भत्त्यांमध्ये वाढ करणे संदर्भात या निवेदनात मागणी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण राज्य कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता नेमका किती वाढणार याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
किती वाढणार HRA ?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार महागाई भत्ता 50% क्रॉस झाल्यानंतर घर भाडे भत्ता देखील सुधारित करण्याची तरतूद आहे. फक्त घर भाडे भत्ताच नव्हे तर इतरही अन्य भत्ते वाढवण्याचे सातवा वेतन आयोगामध्ये नमूद आहे.
वित्त विभागाच्या शासन निर्णयामध्ये देखील याबाबतचा संदर्भ देण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयात जेव्हा महागाई भत्ता 50% पेक्षा अधिक होईल तेव्हा घर भाडे भत्ता वाढवला गेला पाहिजे अशी तरतूद आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयाच्या, वास्तव्याच्या ठिकाणानुसार 27%, 18% आणि 9% प्रमाणे HRA मिळतोय. पण, यामध्ये तीन टक्क्यांपर्यंतची वाढ होणार असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणांनुसार 30%, 20% आणि 10% प्रमाणे घर भाडे भत्ता दिला जाणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. मात्र जुलै 2024 पासून महागाई भत्ता 53% होणार आहे. याबाबतचा निर्णय हा हिवाळी अधिवेशनानंतर घेतला जाईल मात्र महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासूनच लागू राहणार आहे.
यामुळे घर भाडे भत्ता देखील जुलै 2024 पासूनच लागू होईल असे बोलले जात आहे. असे झाल्यास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ, घरभाडे भत्ता वाढ तसेच महागाई भत्ता फरक आणि घर भाडे फक्त फरक याचा लाभ सुद्धा मिळणार आहे.