7th Pay Commission Maharashtra : महाराष्ट्र राज्य शासनात कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी समोर येत आहे. खरं पाहता केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2022 मध्येच 38 टक्के दराने महागाई भत्ता वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. तत्पूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता.
दरम्यान आता राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणे अपेक्षित आहे. मात्र, वर्षानुवर्षाची परंपरा राज्य शासनाकडून कंटिन्यू केली जात असून केंद्र शासनाने महागाई भत्ता वाढीचा लाभ दिल्यानंतर लगेचच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ देण्याचा विचारही राज्य शासनाने केलेला नाही. आता जुलै 2022 मधील महागाई भत्ता वाढीचा लाभ हा राज्य कर्मचाऱ्यांना चक्क 2023 मध्ये मिळणार आहे.

विशेष म्हणजे ज्यावेळी राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळण्यास सुरुवात होईल त्यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात अजून वाढ होईल. जसं की आपणास ठाऊकच आहे सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. पहिली वाढ ही जानेवारी महिन्यात दिली जाते आणि दुसरी वाढ ही जुलै महिन्यात दिली जाते.
अशा परिस्थितीत आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीचा लाभ हा अनुद्योय केला जाणार आहे. जाणकार लोकांच्या मते आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जवळपास 42 टक्के दराने महागाई भत्ता लागू होणार आहे. म्हणजेच सध्या मिळत असलेल्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.
दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही 34 टक्के दरानेच महागाई भत्ता मिळत असून राज्य कर्मचारी 38 टक्के दराने महागाई भत्ता लवकरात लवकर राज्य कर्मचाऱ्यांना लागू करावा अशी मागणी केल्या कित्येक दिवसांपासून करत आहे. परंतु आता राज्य कर्मचाऱ्यांची ही मागणी फळाला आली असून राज्यातील कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ देण्यासाठी राज्य शासन दरबारी हालचाली तेज झाल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
एका मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या दाव्यानुसार, महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यात अनुज्ञेय करण्यात येणार आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून ते जानेवारी महिन्यापर्यंतची महागाई भत्ता थकबाकी देखील मिळणार आहे. यासाठी निधीची तरतूद शासन दरबारी करण्यात आली असल्याचे या मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे.
निश्चितच जर जानेवारी महिन्यात महागाई भत्ता वाढीचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळाला तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक अशी बातमी राहणार आहे.