7th Pay Commission : सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठवा वेतन आयोगाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. जानेवारी 2025 मध्ये आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.
तेव्हापासूनच नव्या आठव्या वेतन आयोगाच्या बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत.

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट
सरकारी नोकरदार मंडळीला वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते. पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित केला जातो.
यानुसार 2025 च्या पहिला सहामाहीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय मार्च 2025 मध्ये झाला असून ही वाढ जानेवारी 2025 पासून प्रत्यक्षात लागू करण्यात आली आहे.
या निर्णयानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के एवढा झाला आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढतो याची प्रतीक्षा आहे.
जुलैमध्ये महागाई भत्ता किती वाढणार?
जानेवारी महिन्यापासून चा महागाई भत्ता जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील नेहमीप्रमाणे एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरवण्यात आला आहे. आता जानेवारी 2025 ते जून 2025 या कालावधीच्या एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जुलै 2025 पासून महागाई भत्ता किती वाढणार हे ठरणार आहे.
2025 च्या पहिल्या तीन महिन्यांत म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांमध्ये महागाईत मोठी घट दिसली. याचा परिणाम म्हणून आता जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 2% पेक्षा कमी वाढणार अशी शक्यता जाणकार लोकांकडून वर्तवण्यात आली आहे.
2025 च्या पहिल्या दोन महिन्यांतील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI-IW) डेटामध्ये घट झाली आहे, ज्यामुळे जुलै-डिसेंबर 2025 साठी DA वाढ ही कमीचं राहू शकते. AICPI-IW हे कर्मचाऱ्यांच्या DA वाढीची गणना करण्यासाठी एक महत्त्वाचे मेट्रिक आहे.
आता जर यात पुढील 4 महिने घसरणीचा ट्रेंड कायम राहिला तर महागाई भत्त्यावर परिणाम होऊ शकतो. सध्याच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यापासून देखील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता फक्त दोन टक्क्यांनीच वाढणार असे बोलले जात आहेत.
तथापि याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा केंद्रातील सरकारकडून घेतला जाणार असून हा निर्णय एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसारच होईल. यामुळे आता एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांची महागाई भत्ता आकडेवारी काय राहते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.