सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता आणि DA थकबाकीची रक्कमही मिळणार, केव्हा निघणार GR

Published on -

7th Pay Commission News : तारीख 17 मार्च 2025, या दिवशी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाला मान्यता दिली. दरम्यान आठवा वेतन आयोगाची भेट दिल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकार पुन्हा एकदा एक मोठी भेट देणार आहे. सातवा वेतन आयोगांतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा वाढणार आहे.

खरे तर होळीच्या आधीच महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय होणे अपेक्षित होते. पण, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) वाढीची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. यापूर्वी असे सांगितले जात होते की, 12 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीए वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते.

मात्र, होळी संपली तरीही DA वाढीची घोषणा झालेली नाही. आता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, येत्या आठवड्यात केंद्र सरकारकडून महागाई भत्त्याची वाढ जाहीर होऊ शकते. अशा परिस्थितीत आता आपण केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नेमका कितीने वाढू शकतो याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किती वाढणार महागाई भत्ता?

सध्या केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 53 टक्के डीए दिला जात आहे. मात्र यामध्ये दोन ते तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे DA 55 किंवा 56 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. महागाई भत्ता वाढीचा निर्णय झाल्यानंतर देशातील जवळपास एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. मात्र, अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच होईल आणि त्यानंतर वित्त मंत्रालयाकडून अधिकृत आदेश जारी केले जातील. ही वाढ 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार केली जाणार आहे.

वर्षातून दोनदा मिळतो महागाई भत्ता वाढीचा लाभ

दरवर्षी मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्ता व महागाई सवलत भत्ता वाढवला जातो. मात्र मार्च महिन्यात होणाऱ्या महागाई भत्ता वाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी जानेवारी महिन्यापासून आणि ऑक्टोबर महिन्याच्या निर्णयाची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून होत असते.

दरम्यान, यंदा देखील जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता वाढवला जाणार असून त्याची अधिकृत घोषणा मार्चच्या शेवटी अपेक्षित आहे. नवीन दर जानेवारीपासून लागू होणार असल्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचा एरिअर म्हणजेच महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील कर्मचार्‍यांना मार्च महिन्याच्या वाढीव वेतनासोबतचं मिळणार आहे.

महागाई भत्त्याची गणना औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) वर आधारित असते. सध्या डीए 53 टक्के आहे आणि जानेवारी 2025 मध्ये त्याचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. हे दर श्रम मंत्रालयाद्वारे जाहीर होणाऱ्या ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स (AICPI) वर अवलंबून असतात.

जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीतील AICPI निर्देशांक 143.7 अंकांवर पोहोचला आहे आणि डीए स्कोअर 55.99 टक्क्यांपर्यंत गेला आहे. त्यामुळे डीए 2 किंवा 3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मात्र जर यावेळी महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढला तर ही DA वाढ गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी वाढ असू शकते. याआधी 2018 मध्ये जुलै-दिसेंबर कालावधीसाठी डीए 2 टक्क्यांनी वाढवला गेला होता.

पगार कितीने वाढणार?

डीए 2 टक्क्यांनी वाढल्यास, ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18,000 रुपये आहे, त्यांना 9,900 रुपये महागाई भत्ता मिळेल. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 50,000 रुपये असेल तर सध्याचा 53 टक्के डीएनुसार त्याचे एकूण वेतन 76,500 रुपये आहे. पण, डीए दर 56 टक्क्यांपर्यंत वाढल्यास त्याचे एकूण वेतन 78,000 रुपये होईल.

यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या वाढीची प्रतीक्षा कायम आहे, आणि येत्या आठवड्यात यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अजूनही अधिकृत अपडेट हाती आलेली नाही म्हणून महागाई भत्ता वाढीचा नेमका निर्णय कधी होणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe