7th Pay Commission News : सातवा वेतन आयोगातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर मार्च 2025 मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका झाला.
याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात झाला असला तरी देखील ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली. दरम्यान आता जुलै महिन्यापासून पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे.

दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोनदा सुधारित होत असतो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित केला जातो. जानेवारी महिन्यापासून चा महागाई भत्ता वाढीबाबतचा अधिकृत निर्णय मार्च महिन्यात होतो आणि जुलै महिन्यापासून चा महागाई भत्ता वाढीबाबतचा अधिकृत निर्णय हा साधारणता दिवाळीच्या आसपास होतो.
महागाई भत्ता वाढ ही एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असते. जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधी मधील आयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जानेवारी 2025 पासून चा महागाई भत्ता ठरवण्यात आला आहे. तसेच आता जानेवारी 2025 30 जून 2025 या कालावधीमधील एआयसीपीआयचे आकडेवारीनुसार जुलैपासून महागाई भत्ता किती वाढणार हे ठरणार आहे.
जुलै पासून महागाई भत्ता किती वाढणार?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एआयसीपीआयची जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या चार महिन्यांची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र अजून मे आणि जून या दोन महिन्यांची आकडेवारी येणे बाकी आहे.
त्यामुळे नेमका महागाई भत्ता किती वाढणार हे आत्ताच सांगणे थोडे कठीण आहे पण या चार महिन्यांच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता किती वाढू शकतो या संदर्भात जाणकारांकडून माहिती दिली जात आहे. जाणकार सांगतात की सध्याच्या चार महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता यावेळी महागाई भत्ता 2% ऐवजी 3% वाढण्याची शक्यता आहे.
म्हणजेच महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून थेट 58% होणार आहे आणि ही वाढ जुलै 2025 पासून लागू राहील. तथापि याबाबतचा शासन निर्णय हा दिवाळीच्या आसपास निघू शकतो. ऑक्टोबर मध्ये किंवा नोव्हेंबर मध्ये याबाबत अधिकृत शासन निर्णय जारी होईल अशी शक्यता आहे.
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्याची आकडेवारी काय सांगते ?
एप्रिल 2025 मध्ये एआयसीपीआय-आयडब्ल्यू निर्देशांक 143.5 वर पोहचलाय, जो जानेवारी 2025 च्या 143.2 पेक्षा जास्त नोंदविला गेला आहे. महत्वाची बाब म्हणजे सलग दुसऱ्या महिन्याच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी 2025 मध्ये निर्देशांकात घट पाहायला मिळाली होती.
कामगार ब्युरोने 30 मे 2025 च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अखिल भारतीय सीपीआय-आयडब्ल्यू एप्रिल 2025 मध्ये 0.5 गुणांवरून 143.5 वर पोहचले आहेत. मार्चमध्ये, एआयसीपीआय-आयडब्ल्यू निर्देशांक 0.2 पॉईंटने वाढला आणि 143.0 वर पोहचलेत हे जानेवारीच्या तुलनेत किंचित कमी असले तरी आधीच्या महिन्यांच्या तुलनेत चांगले होते.
दरम्यान, मागील 2 महिन्यांत म्हणजे मार्च आणि एप्रिलमध्ये एआयसीपीआय-आयडब्ल्यू मधील वाढीवरून असे दिसून आले आहे की केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी (डीए/डीआर) सुमारे 57.95% असू शकतो म्हणजेच जुलै 2025 पासून महागाई भत्ता 3% वाढण्याची शक्यता आहे.