7th Pay Commission News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 53 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी वाढ होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जात असतो.
यानुसार जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात असून आता जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता पुन्हा सुधारित होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2024 पासून तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता.
आता हा महागाई भत्ता कितीने वाढणार याची सरकारी कर्मचाऱ्यांना उत्सुकता लागली आहे. महागाई भत्ता वाढ एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असते.
म्हणजेच जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या काळातील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता कितीने वाढणार हे स्पष्ट होणार आहे.
सध्या स्थितीला एआयसीपीआयची नोव्हेंबर महिन्यापर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. या महागाई भत्ता आकडेवारीनुसार आत्तापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 56 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
दरम्यान डिसेंबर महिन्यात यायचे आकडेवारीत फार मोठा बदल होणार नसल्याने जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता तीन टक्क्यांनीच वाढेल म्हणजेच महागाई भत्ता 56 टक्क्यांवर जाणार आहे.
ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहणार असली तरी देखील याबाबतचा निर्णय हा मार्च महिन्यात होईल. मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात होळी सणाच्या आधी याबाबतचा निर्णय होऊ शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल अन त्यामध्ये महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे.
नक्कीच मार्च महिन्यात याबाबतचा निर्णय झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण, महागाई भत्ता कितीने वाढणार आणि याबाबतचा निर्णय मार्च महिन्यातच होणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मात्र गेल्या वर्षी मार्च महिन्यातचं सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला होता आणि यंदाही मार्च महिन्यातच महागाई भत्ता सुधारित होण्याची शक्यता आहे.