गुड न्युज ! सातव्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता प्रमाणेच ‘या’ भत्याचाही वर्षातून दोनदा लाभ मिळणार ! वाचा सविस्तर

सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. ज्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट ड्रेस कोड लागू असतो त्या कर्मचाऱ्यांसाठी ही न्यूज अगदीच महत्त्वाची राहणार आहे. कारण की या कर्मचाऱ्यांना आता वर्षातून दोनदा ड्रेस भत्ता मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा जुलै महिन्यानंतर जे कर्मचारी सेवेत येतील त्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

Published on -

7th Pay Commission News : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या देशात एका गोष्टीची विशेष चर्चा सुरू आहे आणि ती गोष्ट म्हणजे आठवा वेतन आयोग. 16 मार्च 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि त्यानंतरआठव्या वेतन आयोगाच्या चर्चांनी खऱ्या अर्थाने जोर पकडला.

आठव्या वेतन आयोगाबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत मात्र अशाच सातव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे सातव्या वेतन आयोगाच्या काही कर्मचाऱ्यांना आता एका वर्षात महागाई भत्ता वाढीप्रमाणे दोनदा ड्रेस भत्याचा लाभ दिला जाणार आहे.

7 मार्च 2025 रोजी याबाबत केंद्रातील वित्त विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. खरे तर यासाठी केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तब्बल सात वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता आणि अखेरकार आता हा पाठपुरावा यशस्वी झाला असून सरकारी कर्मचाऱ्यांना आता वर्षातून दोनदा ड्रेस भत्ता दिला जाणार आहे.

हा निर्णय अशा कर्मचाऱ्यांसाठी विशेष फायद्याचा ठरणार आहे जे की वर्षाच्या मध्येच सर्विस जॉईन करतात. यापूर्वी दरवर्षी जुलै महिन्यात ड्रेस भत्ता दिला जात होता, हा भत्ता एकाच वेळी दिला जात होता.

याचा परिणाम म्हणून जे कर्मचारी वर्षाच्या मध्येच म्हणजे जुलैनंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र, आता नवीन प्रो-रेटा पेमेंट प्रक्रियेअंतर्गत, कर्मचाऱ्यांना रुजू होण्याच्या महिन्यापासून पुढील वर्षी जूनपर्यंतच्या कालावधीनुसार ड्रेस भत्ता मिळणार आहे.

यामुळे जुलै नंतर सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. आता आपण ड्रेस भत्ता म्हणजे नेमका कोणता पत्ता याच बाबत माहिती पाहणार आहोत. ड्रेस भत्ता मध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो याबाबत सुद्धा आता आपण पुढे माहिती पाहणार आहोत.

ड्रेस भत्ता म्हणजे काय बरं ?

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रेस भत्ता मध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो याबाबत 2017 मध्ये एक अधिसूचना काढण्यात आली होती. केंद्रातील सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून अधिसूचना काढण्यात आली ज्यामध्ये ड्रेस भत्त्यात कपडे भत्ता, बूट भत्ता, किट देखभाल भत्ता, रोब अलाउन्स इत्यादींचा समावेश होतो.

ही रक्कम अशा कर्मचाऱ्यांना दिली जाते ज्यांना कर्तव्यावर असताना विशेष ड्रेस कोड घालावा लागतो. आधी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी म्हणजेच जुलै महिन्यात ड्रेस भत्ता मिळत होता. मात्र आता जुलै महिन्यानंतरच सामील झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ड्रेस भत्ता मिळणार आहे आणि यासाठी एक स्पेशल फॉर्मुलानुसार ड्रेस भत्ता मिळणार आहे.

जर समजा एखादा कर्मचारी ऑगस्ट महिन्यात सामील झाला आणि त्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना जर वार्षिक वीस हजार रुपये मिळत असतील तर ऑगस्ट महिन्यात जॉईन झालेल्या अशा कर्मचाऱ्याला (20000/12)×11 = 18 हजार 333 रुपये मिळणार आहेत. आता आपण कोणत्या कर्मचाऱ्यांना किती ड्रेस भत्ता मिळतो याबाबत माहिती पाहणार आहोत.

किती मिळणार ड्रेस भत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, आर्मी ऑफिसर्स, एअरफोर्स, नेव्ही, सीएपीएफ, कोस्ट गार्ड यांना वार्षिक 20,000 रुपये इतका ड्रेस भत्ता मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांनंतर पोलीस अधिकारी, MNS अधिकारी, कस्टम्स, नार्कोटिक्स, NIA, ICLS, ब्यूरो ऑफ इमिग्रेशन इत्यादींना वार्षिक 10,000 रु. ड्रेस भत्ता दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच रेल्वेचे स्टेशन मास्तर, संरक्षण सेवा, केंद्रशासित प्रदेशातील पोलीस इत्यादी कर्मचाऱ्यांनाही वार्षिक दहा हजार रुपयाचा ड्रेस भत्ता मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ट्रॅकमन, स्टाफ कार ड्रायव्हर, कॅन्टीन स्टाफ, रनिंग स्टाफ इत्यादींना वार्षिक 5,000 रुपये ड्रेस भत्ता दिला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News