7th Pay Commission News : सध्या संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाची धूम आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान याच आनंदाच्या वातावरणात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा वाढवला जाणार आहे. उद्या याबाबतची घोषणा होणार आहे. उद्या अर्थातच 9 ऑक्टोबर 2024 ला केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढी बाबतच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवू शकते.

ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो. मात्र आता यामध्ये तीन ते चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकार या प्रस्तावावर चर्चा करून यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. एवढेच नाही तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देखील मिळणार आहे. याबाबतचा निर्णय देखील उद्या होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन ते चार टक्क्यांनी वाढल्यानंतर त्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पगारात किती वाढ होणार?
जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून वाढून 54 टक्के झाला तर अठरा हजार रुपये पगारा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 9000 रुपयांऐवजी 9720 रुपये एवढा महागाई भत्ता मिळणार आहे. तसेच जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% झाला तर या सरकारी नोकरदार मंडळीला 9540 रुपये एवढा महागाई भत्ता मिळणार आहे.
अर्थातच जर महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला तर 18 हजार रुपये बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तात 540 रुपयांची आणि भत्ता चार टक्क्यांनी वाढला तर 18 हजार रुपये बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 720 रुपयांनी वाढ होणार आहे.
कधीपासून मिळणार लाभ
उद्या जर याबाबतचा निर्णय झाला तर ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत म्हणजेच जो पगार नोव्हेंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या पगारांसोबत वाढीव महागाई भत्याचा लाभ मिळणार आहे.
ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील सरकारी नोकरदार मंडळीच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.