7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विजयादशमीच्या आधीच सरकारी नोकरदारांना एक मोठा आर्थिक लाभ दिला जाणार आहे. खरेतर, पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण साजरा करण्यात येणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांना लक्ष्मी माता प्रसन्न झाली आहे.
शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अखेरकार बोनसची घोषणा केली आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून बोनसच्या चर्चा सुरू होत्या आणि आता सरकारने बोनसवर शिक्कामोर्तब केला आहे. शासनाने गट क आणि राजपत्रित गट ब संवर्गातील कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे.

या कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिव्हीटी लिंक्ड बोनस जाहीर करण्यात आलाय. कर्मचाऱ्यांना 30 दिवसांचा ऍड हॉक बोनस दिला जाणार आहे. याचे आदेश अर्थ मंत्रालयाने जारी केले आहेत. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून सहा हजार 907 रुपयांचा बोनस दिला जाईल.
या बोनसचा लाभ 31 मार्च 2025 पर्यंत सेवेत असणाऱ्या व किमान सलग सहा महिने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांनी 12 महिने काम केलेले नसेल त्यांना जेवढे काम केले आहे त्या आधारावर बोनस मिळेल.
केंद्रीय निमलष्करी व सशस्त्र दलाचे कर्मचारी सुद्धा याच्या लाभासाठी पात्र राहतील. केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्र सरकारच्या वेतन संरचनेनुसार काम करणारे व इतर बोनस साठी अपात्र ठरणाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळेल.
गेल्या तीन वर्षात निर्धारित कालावधीपर्यंत काम करणाऱ्या कॅज्युअल लेबरर यांना सुद्धा बोनस चा लाभ दिला जाईल. अशा कर्मचाऱ्यांना 1184 रुपयांचा बोनस मिळणार आहे. निवृत्त, राजीनामा किंवा निधन झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी किमान सहा महिन्यांची सेवा पूर्ण केलेल्यांनाच बोनस मिळणार आहे.
प्रतिनियुक्तीवर अन्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या संबंधित संस्थांकडून बोनस मिळेल. बोनसची रक्कम ही सात हजार रुपये मासिक वेतन गृहीत धरून केली जाणार आहे.
त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दिवाळीच्या आधीच घोषणा करण्यात आली असल्याने संबंधितांच्या माध्यमातून शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.