26 मार्च 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना देणार मोठी भेट ! ‘ही’ प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता

उद्याचा दिवस केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फारच खास ठरणार आहे. केंद्रातील मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत उद्या अंतिम निर्णय घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

Updated on -

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे महागाई भत्ता वाढी संदर्भात. दरवर्षी एकीकडे होळी रंगपंचमी धुलीवंदन आणि शिमगोत्सवाची धूम सुरू असते तर दुसरीकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढत असतो.

होळी सणाच्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याची रीत आतापर्यंत फॉलो करण्यात आली होती. यंदा मात्र होळी सण उलटल्यानंतरही महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय झालेला नाही. यंदा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महागाई भत्त्याच्या वाढीची प्रतिक्षा अधिक लांबली आहे.

होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून महागाई भत्ता वाढीची घोषणा होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. 19 मार्च 2025 रोजी होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल असे म्हटले जात होते. परंतु याबाबतचा निर्णय 19 तारखेला ही झाला नाही. दरम्यान आता केंद्रातील सरकारकडून उद्या अर्थातच 26 मार्च रोजी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांकडून महागाई भत्ता वाढीची भेट लवकरात लवकर मिळावी अशी मागणी केली जात असून याच अनुषंगाने उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर केला जाण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर वित्त मंत्रालय आदेश जारी करेल, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

पण, मागील वर्षी देखील मार्चच्या शेवटी महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आली होती. यामुळे मार्च महिना संपपर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाईल अशा चर्चांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोर पकडला आहे. सध्या केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात आहे.

मात्र आता यामध्ये आणखी दोन ते तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एक तर 55% होईल किंवा 56% होईल. तसेच ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू होणार असून ती श्रम मंत्रालयाच्या अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या (AICPI) जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यानच्या आकडेवारीवर अवलंबून असेल.

महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार की 3 टक्क्यांनी

जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीतील AICPI निर्देशांक 143.7 अंकांवर पोहोचला असून DA स्कोअर 55.99% झाला आहे. या आकडेवारीनुसार जर महागाई भत्ता वाढीचा अंदाज बांधला तर यावेळी महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्याची वाढ 0.50 च्या जवळपास असल्यास राउंड ऑफ करून अंतिम दर ठरवला जातो.

यावरून यावेळी महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 56 टक्के होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान हे नवीन दर जानेवारी 2025 पासून लागू होतील, त्यामुळे जर मार्च महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला तर कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचे दोन महिन्यांचे एरिअर्सही म्हणजेच महागाई भत्ता थकबाकी सुद्धा मिळणार आहे.

केंद्र सरकार प्रत्येक वर्षी दोन वेळा महागाई भत्ता आणि महागाई राहत दरात सुधारणा करते. हे दर अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या सहामाही आकडेवारीवर अवलंबून असतात. जानेवारी आणि जुलै महिन्यांपासून ही वाढ लागू होते आणि त्याची घोषणा मार्च व ऑक्टोबर महिन्यात केली जाते.

त्यामुळे आता मार्च अखेर होणाऱ्या बैठकीकडे केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. मार्च महिन्याच्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या या शेवटच्या बैठकीत खरंच महागाई भत्ता वाढीच्या प्रस्तावावर निर्णय होणार का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe