…….म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय लांबणीवर ! राज्य कर्मचाऱ्यांचा डीए कधी वाढणार ?

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात सुधारित करण्यात आला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित होणार असून याच संदर्भात आता एक नवीन अपडेट हाती आली आहे.

Published on -

7th Pay Commission : सातव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत असेल तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे.

खरे तर मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. राज्य कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली.

म्हणजेच याबाबतचा निर्णय जरी मार्च महिन्यात झाला असला तरी देखील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला. दुसरीकडे केंद्रातील या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित करण्याचा निर्णय झाला.

विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 53 टक्क्यांवरून 55% इतका करण्यात आला आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला.

मात्र अद्याप महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता मात्र वाढवण्यात आलेला नाही. सध्या स्थितीला राज्य कर्मचाऱ्यांना फक्त 53% दराने महागाई भत्ता दिला जात आहे.

यामुळे राज्य कर्मचारी त्यांना महागाई भत्ता वाढीची भेट कधी मिळणार हा सवाल उपस्थित करत आहेत. दरम्यान आता याच संदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे.

कोण कोणत्या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढला?

आतापर्यंत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू यांसारख्या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे. मध्यप्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एकाच वेळी पाच टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.

एमपी मधील राज्य कर्मचाऱ्यांना फक्त 50% दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र यामध्ये आता पाच टक्क्यांची वाढ करण्यात आली असून त्यांना जुलै 2024 पासून 53 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे आणि जानेवारी 2025 पासून 55 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे या संबंधित कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम एकूण पाच हप्त्यांमध्ये वितरित करण्याच्या सूचना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार?

एमपी मधील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुधारित करण्यात आला असून आता राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार हा मोठा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

दरम्यान मीडिया रिपोर्ट मध्ये असे सांगितले गेले आहे की सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आहे आणि याचमुळे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थोडासा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

मात्र राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका केला जाणार हे फिक्स आहे अन याबाबतचा निर्णय जून किंवा जुलै महिन्यात होणे अपेक्षित आहे. तथापि हा निर्णय कधीही झाला तरी देखील या निर्णयाची अंमलबजावणी ही जानेवारी 2025 पासूनच होईल असे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News