विजयादशमी आधीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, आता किती मिळणार DA?

3 ऑक्टोबरला होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% करण्याबाबतच्या प्रस्तावावर या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सही करणार असे सांगितले जात आहे.

Tejas B Shelar
Published:
7th Pay Commission

7th Pay Commission : सणासुदीच्या दिवसांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी सिक्कीम राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की सिक्कीम राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे.

दुर्गा पूजा उत्सवापूर्वी सिक्कीम सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 4% ने वाढवला आहे. राज्याचे मुख्य सचिव व्ही.बी.पाठक यांनी जारी केलेल्या परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

यामुळे आता सिक्कीम राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 50% होणार आहे. आतापर्यंत सिक्कीम राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% होता.

मात्र आता हा भत्ता चार टक्के वाढविण्यात आला असून 50 टक्के झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर जानेवारी 2024 पासून लागू आहे.

एकीकडे सिक्कीम राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना विजयादशमीच्या आधी मोठी भेट मिळाली आहे तर दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांना देखील विजयादशमीच्या आधीच एक गोड बातमी मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबरला होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% करण्याबाबतच्या प्रस्तावावर या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सही करणार असे सांगितले जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणारी ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून अनुज्ञय राहणार आहे. याचा रोख लाभ मात्र ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबतच दिला जाईल.

अर्थातच जो पगार नोव्हेंबर महिन्यात खात्यात येईल त्या पगारा सोबत याचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe