Good News : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय ‘या’ तारखेला होणार ! मंत्रालयातील हालचाली काय सांगतात? पहा….

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार? या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत आणि आता कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा समाप्त होणार असे चित्र आहे.

Published on -

7th Pay Commission : मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 55% इतका करण्यात आला. ही वाढ या संबंधीत नोकरदार मंडळींना जानेवारी महिन्यापासून लागू झाली. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढ लागू होणे अपेक्षित आहे.

मात्र अजून महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 53 % वरून अडकून पडला आहे आणि यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्य कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता वाढ कधी मिळणार याकडे विशेष लक्ष आहे.

दुसरीकडे सध्या राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या पावसाळी अधिवेशनात महागाई भत्ता वाढीचा निर्णय होऊ शकतो अशी आशा देखील कर्मचाऱ्यांना आहे. असे असतानाच आता राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढवला जाणार याबाबत एक नव अपडेट हाती आल आहे. 

कधीपासून वाढणार महागाई भत्ता? 

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली दोन टक्के महागाई भत्ता वाढ आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना सुद्धा लागू होणार आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा 53% वरून 55% होणार आहे.

महागाई भत्ता मध्ये दोन टक्क्यांची वाढ होणार असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू केली जाणार आहे. मात्र या संदर्भातील शासन निर्णय अजूनही निघालेला नाही. 

कधी निघणार शासन निर्णय?

मिळालेल्या माहितीनुसार वित्त विभागाकडून महागाई भत्ता वाढी बाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

म्हणजेच पुढील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे मीडिया रिपोर्ट्स मध्ये या महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत महागाई भत्ता वाढीबाबतचा अधिकृत शासन निर्णय जारी होईल असा दावा केला जात आहे.

जर समजा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महागाई भत्ता 55% करण्याबाबतचा जीआर जारी झाला तर जुलै महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच ऑगस्ट महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जो पगार जमा होईल त्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 ते जून 2025 या सहा महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!