दिवाळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट! ‘या’ मागणीवर सरकार सकारात्मक निर्णय घेणार, कधीपर्यंत निघू शकतो जीआर ?

आता, सरकार हे रोखलेले हप्ते महागाई भत्त्यासोबत जोडू शकते आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते. या योजनेंतर्गत महागाई भत्त्यात वाढीसह ही थकबाकीही कर्मचाऱ्यांना मिळू शकते असा दावा काही प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आला आहे.

Published on -

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर, कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी गोठवली होती. कोरोना काळात केंद्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला होता.

यामुळे सरकारने कोरोना काळातील महागाई भत्ता फरकाची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केले नाही. परंतु कोरोना काळ उलटल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना ही महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणे अपेक्षित होते.

मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की सरकार कोविड-19 दरम्यान रोखून ठेवलेली 18 महिन्यांची महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) ची थकबाकी देण्याचा कुठलाच विचार करत नाहीये.

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांची १८ महिन्यांची थकबाकी सोडण्याचा निर्णय सरकार घेणार आहे का, असे मंत्र्यांना विचारले असता त्यांनी ‘नाही’ असे सरळ उत्तर दिले. महामारीच्या काळात आर्थिक संकटामुळे सरकारने या भत्त्यांचे हप्ते बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारची आर्थिक स्थिती आता सुधारली असून, त्यामुळे ही थकबाकी दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

पण, सरकार लवकरच हा दिलासा देणार असल्याची अफवा वेगाने पसरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार 18 महिन्यांची थकबाकी आगामी महागाई भत्त्याने (डीए) देण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021 चे तीन हप्ते महामारीमुळे थांबवण्यात आले जेणेकरून सरकारवरील आर्थिक दबाव कमी करता येईल. आता, सरकार हे रोखलेले हप्ते महागाई भत्त्यासोबत जोडू शकते आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते.

या योजनेंतर्गत महागाई भत्त्यात वाढीसह ही थकबाकीही कर्मचाऱ्यांना मिळू शकते असा दावा काही प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आला आहे. सरकारने लवकरच डीए वाढवण्याची घोषणा केली आणि 18 महिन्यांची थकबाकी जाहीर केली, तर दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी असेल.

त्यामुळे पगाराबरोबरच कर्मचाऱ्यांच्या खात्यातही मोठी रक्कम जमा होणार असून, त्यामुळे सणासुदीच्या काळात त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तथापि, आतापर्यंत ही केवळ स्त्रोतांकडून उपलब्ध माहिती आहे आणि सरकारकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही.

असे असले तरी ही योजना कार्यान्वित झाल्यास कर्मचाऱ्यांसाठी ही दिवाळी विशेष ठरणार असून, त्यांना काही प्रमाणात आर्थिक त्रासातून दिलासा मिळू शकेल. महागाई भत्त्यात वाढ आणि १८ महिन्यांची थकबाकी याबाबत सरकार काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, लवकरच याबाबत ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe