7th Pay Commission : देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना पुढील ऑगस्ट महिन्यात एक मोठी भेट मिळणार आहे. खरे तर ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा होईल. दरम्यान, रक्षाबंधनाच्या आधीच केंद्रातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे.
याआधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात वाढवण्यात आला होता. मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता.

मात्र ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली. दरम्यान आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा महागाई भत्ता सुधारित होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याची संभाव्य तारीख सुद्धा समोर येत आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार ?
ऑगस्ट महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता तीन ते चार टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% इतका आहे.
अर्थातच जर ऑगस्ट महिन्यात महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला तर सरकारी कर्मचाऱ्यांना 58% दराने आणि चार टक्क्यांनी वाढ झाली तर 59 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ जुलै 2025 पासून लागू राहील.
शासन निर्णय कधी जारी होणार ?
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58% किंवा 59% इतका केला जाणार असून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जारी होऊ शकतो.
यावर्षी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे आणि या रक्षाबंधनाच्या आधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट दिली जाईल अशी दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. पहिल्यांदा जानेवारी आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. मात्र याचा अधिकृत निर्णय हा अनुक्रमे मार्च आणि सप्टेंबर – ऑक्टोबर मध्ये घेतला जातो.
पण यावेळी जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढीबाबत अधिकृत शासन निर्णय ऑगस्टमध्ये असं निघेल अशी आशा आहे. तथापि, याबाबत अजूनही सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही यामुळे सरकार खरच पुढील महिन्यात महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेणार का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.