7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी राज्य शासकीय सेवेत सेवा देत असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे.
कारण की, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दोन प्रलंबित मागण्या आगामी काळात पूर्ण होतील असे वृत्त हाती येत आहे. यातील एक मागणी ही पुढील महिन्यात पूर्ण होईल तर दुसऱ्या मागणीबाबत आगामी काळात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिपायापासून ते क्लर्कपर्यंत, कोणाचा पगार किती वाढणार ?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार
केंद्रातील सरकारने मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के इतका केला आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ दिल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता सुद्धा सुधारित केला जाणार आहे.
हे पण वाचा : आठवा वेतन आयोगात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगार किती वाढणार ?
खरे तर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्राच्या धरतीवर 55% इतका करण्यात आला आहे. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात,तामिळनाडू या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकताच सुधारित करण्यात आला असून आता महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित होईल अशी आशा आहे.
हे पण वाचा : जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) किती वाढणार ? समोर आली मोठी आकडेवारी
सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% इतका असून यामध्ये आणखी दोन टक्क्यांची वाढ होणार आहे आणि ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहील. पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात याबाबतचा अधिकृत निर्णय निर्गमित होऊ शकतो असा सुद्धा दावा केला जातोय. ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने जानेवारीपासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.
सेवानिवृत्तीचे वय सुद्धा वाढवले जाणार
सध्या महाराष्ट्र राज्यातील अ, ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष इतके आहे. तर दुसरीकडे ड संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वय 60 वर्ष इतके आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांबाबत बोलायचं झालं तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे आणि देशातील जवळपास 25 हून अधिक राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे वय 60 वर्ष इतके आहे.
यामुळे राज्यातील अ, ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 60 वर्षे एवढे झाले पाहिजे अशी मागणी उपस्थित केली जात आहे.महत्त्वाची बाब अशी की, गेल्या शिंदे सरकारच्या काळात या मागणीवर सकारात्मक निर्णय होईल असे आश्वासन देण्यात आले होते.
हे पण वाचा : आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी !
एवढेच नाही तर या संदर्भातला प्रस्ताव सुद्धा रेडी झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र, सदर प्रस्तावाला काही लोकांनी विरोध दाखवला आणि याचमुळे या संदर्भातील सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही. परंतु आगामी काळात राज्य कर्मचाऱ्यांची ही मोठी मागणी पूर्ण होऊ शकते असा विश्वास व्यक्त होतोय. यामुळे खरंच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण होणार का ? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच पगारात होणार 10 हजार 440 रुपयांची वाढ