7th Pay Commission : शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही शासकीय सेवेत कार्यरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रातील सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय केला आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारात मोठी वाढ झाली असून यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळत आहे. परंतु सरकारने नेमका कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे या बोनसचा लाभ कोणाला मिळणार आहे? याबाबत आता आपण माहिती पाहणार आहोत.

कोणाला मिळणार बोनसचा लाभ?
सरकारने केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला आहे. खरेतर हा बोनस आधी सैन्य दलातील अधिकारी / कर्मचाऱ्यांनाच दिला जात होता. मात्र यामध्ये आता मोठा बदल झाला असून आता इतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे.
यामुळे केंद्रीय शासकीय सेवेत असणाऱ्यांना या निर्णयाचा नक्कीच फायदा झाला आहे. आता सैन्य दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमवेत आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत येणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुद्धा या बोनाचा लाभ दिला जाणार आहे.
या संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांचा चाळीस दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळेल अशी माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब अशी की हा बोनस देण्यासाठी म्हणजेच या बोनसचा लाभ देण्यासाठी राष्ट्रपतींची सुद्धा मंजुरी मिळालेली आहे.
महागाई भत्ता पण वाढला
केंद्रीय कर्मचाऱ्यांना फक्त बोनसच नाही तर महागाई भत्ता वाढीची देखील भेट देण्यात आली आहे. जुलै महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे.
पाचवा वेतन आयोग अंतर्गत सहावा वेतन आयोग अंतर्गत आणि सातवा वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% करण्यात आला आहे.
याशिवाय सहावा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सात टक्क्यांनी वाढवण्यात आला असून त्यांचा महागाई भत्ता 239 टक्क्यांवरून 246 टक्के करण्यात आला आहे.
पाचवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सर्वाधिक म्हणजेच 12 टक्क्यांनी वाढवण्यात आला असून त्यांचा DA आता 443 टक्क्यांवरून 455 टक्के करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेली ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार आहे. जुलै ते डिसेंबर 2024 या काळासाठी ही वाढ लागू राहणार आहे.