7th Pay Commission : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी दिवाळी बोनसची घोषणा केली होती. त्याआधी रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची घोषणा करण्यात आली होती.
एवढेच नाही तर राज्य कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचे वेतन दिवाळी आधी वितरित करण्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा विचाराधी नसल्याचे समोर आले होते. याशिवाय मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी बोनस म्हणून 31 हजार रुपये देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीएमसीच्या आयुक्तांनी या संदर्भातील आदेश नुकताच निर्गमित केला. दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
ही बातमी भारतीय डाक विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. भारतीय डाक विभागाकडून नुकताच एक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार डाक विभागातील कर्मचाऱ्यांना 60 दिवसांचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे.
या संबंधित कर्मचाऱ्यांना उत्पादकता-संबंधित बोनस (PLB) जाहीर करण्यात आला आहे. या बोनसचा लाभ विभागातील ग्रुप सी च्या कर्मचाऱ्यांना, मल्टी टास्किंग स्टाफ, अराजपत्रित ग्रुप बी, ग्रामीण डाक सेवक तसेच पूर्णवेळ काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.
31 मार्च 2025 नंतर राजीनामा दिलेले व रिटायर झालेले कर्मचारी सुद्धा या बोनस साठी पात्र राहणार आहेत. डाक विभागाच्या बाहेर प्रतिनियुक्ती वर गेलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना सात हजार रुपये प्रति महिना पगार गृहीत धरून बोनसची रक्कम देण्यात येणार आहे.
एवरेज वेतन × 60 दिन ÷ 30.41 या फॉर्मुल्याच्या आधारावर बोनस दिला जाणार आहे. तसेच कॉन्ट्रॅक्टवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाराशे रुपयांचा काल्पनिक पगार गृहीत धरून बोनस दिला जाईल. नक्कीच डाक विभागाच्या या निर्णयाचा हजारो कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून सदर निर्णयाचे संबंधितांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे.