7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% वरून 53% करण्यात आला.
दरम्यान आता देशातील सीआयएसएफ मधील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. जर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही CISF कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फारच उपयुक्त ठरणार आहे.
नवीन नियमानुसार, आता सेवानिवृत्त सीआयएसएफ कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतर लगेचच भत्त्यांचा आणि पेन्शनचा लाभ मिळू शकणार आहे. सेवानिवृत्त सीआयएसएफ कर्मचाऱ्यांना आता पेन्शन आणि भत्त्यांसाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही.
सध्यास्थितीला कोणत्याही विभागातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी अन सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ मिळवण्यासाठी अनेक महिने सरकारी कार्यालयात जावे लागते.
एक विशिष्ट प्रक्रियेचे पालन केल्यावरच त्यांना त्यांच्या भत्त्याचे पैसे मिळतात आणि पेन्शनचे फायदे मिळू लागतात. आता अशा कोणत्याही समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी, CISF ने सेवानिवृत्तीच्या दिवशी सर्व भत्ते आणि पेन्शनचे पेमेंट सुरू करण्यासाठी ई-सेवा बुक पोर्टल सुरू केले आहे.
गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सीआयएसएफ कर्मचाऱ्यांसाठी ई-सेवा बुक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. सरकारचा हा उपक्रम सीआयएसएफमध्ये यशस्वी झाला, तर आगामी काळात इतर विभागांसाठीही असेच पोर्टल तयार करण्याची तयारी सुरू आहे.
सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके सीआयएसएफच्या विविध कार्यालयांमध्ये पाठवली जातात. फायली वेगवेगळ्या कार्यालयात गेल्याने विलंब आणि चुका होण्याची शक्यता वाढते.
दुर्गम भागातील युनिट्समध्ये बहुतेक समस्या उद्भवतात. मात्र आता नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर सेवा पुस्तकाच्या प्रत्यक्ष हस्तांतरणाची गरज संपुष्टात येणार आहे. आता ई-सर्व्हिस बुक लाँच केल्यामुळे, सर्व्हिस बुकवर रिअल टाइममध्ये लक्ष ठेवता येणार आहे.
एवढेच नाही तर सेवानिवृत्त सीआयएसएफ कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शन फाइलची नेमकी स्थिती एका क्लिकवर कळू शकणार आहे. सीआयएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, ई-सेवा पोर्टलच्या माध्यमातून पेन्शन प्रक्रिया पूर्वीपेक्षा वेगवान होईल.
या आधारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व भत्ते देता येतील. दरवर्षी निवृत्त होणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) 2400 हून अधिक कर्मचाऱ्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.