7th Pay Commission : सातवा वेतन आयोगांतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी फारच कामाची राहणार आहे. जर तुम्हीही शासकीय सेवेत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक खास ठरणार आहे.
खरंतर सध्या संपूर्ण देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आठवा वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. नवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार किती वाढणार, कोणते भत्ते लागु होणार, महागाई भत्ता, घर भाडे भत्ता किती वाढणार ? अशा अनेक गोष्टींबाबत जाणून घेण्याची कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्कंठा पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आज आपण सध्याच्या सातवा वेतन आयोग अंतर्गत कर्मचाऱ्यांना किती हाऊस बिल्डिंग अलाउन्स मिळतोय आणि नव्या आठव्या वेतन आयोगात यामध्ये काय चेंजेस होणार ? या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पहिल्या वेतन आयोगापासून दर 10 वर्षांनी पगार, भत्ते आणि कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या इतर सुविधांमध्ये बदल करण्याची शिफारस करण्यासाठी वेतन आयोग तयार केला जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मागील 7 व्या वेतन आयोगाची स्थापना 10 वर्षांपूर्वी झाली होती.
एक जानेवारी 2016 पासून सध्याचा सातवा वेतन आयोग लागू झाला होता आणि याची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे. खरेतर सध्याच्या सातव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या हाऊस बिल्डिंग अलाउन्स मध्ये मोठी वाढ करण्यात आली होती.
सध्या कर्मचाऱ्यांना किती हाऊस बिल्डिंग अलाउन्स मिळतोय ?
खरे तर सध्याच्या सातवा वेतन आयोगानुसार, कोणतेही केंद्र सरकारचे कर्मचारी घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी एचबीए म्हणजेच होम बिल्डिंग अलाउन्स घेऊ शकतात.
होम बिल्डिंग अलाउन्स अंतर्गत सध्याच्या सातव्या वेतन आयोगातून सरकारी कर्मचाऱ्यांना कमाल 34 महिन्यांच्या मूलभूत वेतनाच्या रकमेएवढी रक्कम कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जात आहे, पण या कर्जाची रक्कम पंचवीस लाखांपेक्षा जास्त राहू शकत नाही.
म्हणजेच होम बिल्डिंग लावून अंतर्गत कमाल 25 लाख रुपयांचे कर्ज कर्मचाऱ्यांना मिळू शकते. होम बिल्डिंग अलाउन्स अंतर्गत कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी जे कर्ज दिले जाते त्यासाठी सध्या 7.44% इतके व्याजदर लागू आहेत.
आठव्या वेतन आयोगात HBA किती वाढणार ?
सध्याच्या सातव्या वेतन आयोग अंतर्गत कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी 25 लाखांचा हाऊस बिल्डिंग अलाऊन्स दिला जातोय. 2008 साली म्हणजेच सहाव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग अलाउन्स म्हणून फक्त साडेसात लाख रुपये दिले जात होते.
पण सातव्या वेतन आयोगात हाऊस बिल्डिंग लावून सह मोठ्या प्रमाणात वाढला आणि आता आठव्या वेतन आयोगात देखील यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
आठव्या वेतन आयोगात हाऊस बिल्डिंग अलाउन्स 40 ते 50 लाख रुपयांपर्यंत केला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे. तथापि यासंदर्भात कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेले नाही यामुळे खरंच एवढी रक्कम वाढणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.