7th Pay Commission Vs 8th Pay Commission : तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी सरकारी कर्मचारी म्हणून सेवा बजावत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये फक्त एका गोष्टीचे चर्चा आहे आणि ती गोष्ट म्हणजे आठवा वेतन आयोग.
खरे तर गेल्या वर्षी आठवा वेतन आयोगाची मागणी जोर धरत होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात आणि त्यानंतरही आठवावेतन आयोगाबाबत जोरदार मागणी करण्यात आली. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या याच मागणीच्या अनुषंगाने 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाला मंजुरी देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय.

खरे तर सध्याचा सातवा वेतन आयोग लागू होऊन आता जवळपास दहा वर्षांचा काळ पूर्ण होत आला आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी या वेतन आयोगाला दहा वर्षे पूर्ण होणार आहेत. वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो यानुसार नवीन आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे.
याच पार्श्वभूमीवर सरकारने आठवा वेतन आयोगाला मंजुरी दिली असून आता येत्या काही दिवसांनी आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे. आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झाल्यानंतर मग ही समिती सरकारला आपल्या शिफारशी देईल आणि त्यानंतर मग प्रत्यक्षात एक जानेवारी 2026 पासून हा नवा वेतन आयोग लागू होणार आहे.
दरम्यान आज आपण सातवा वेतन आयोगातील आणि आठवा वेतन आयोगातील पगारांमधील फरक किती असू शकतो याबाबत थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सातवा वेतन आयोग आणि आठवा वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर मध्ये किती फरक असणार?
सरकारी कर्मचार्यांचा बेसिक पगार ठरवण्यात फिटमेंट फॅक्टर सर्वात महत्वाची भूमिका बजावते.
हाच फिटमेंट फॅक्टर 7व्या वेतन आयोगामध्ये 2.57 होता, ज्यामुळे किमान बेसिक पगार 7,000 वरून 18,000 वर आला. आता 8 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.92 किंवा 2.08 किंवा 2.86 असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
हाच फिटमेंट फॅक्टर कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार किती असणार हे ठरवणार आहे. जर समजा आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना 2.86 इतका फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला तर कर्मचाऱ्यांचा किमान बेसिक पगार अठरा हजार रुपयांवरून 51 हजार 480 रुपयांपर्यंत जाणार आहे.
जर समजा आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना 2.08 इतका फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला तर कर्मचाऱ्यांचा किमान बेसिक पगार अठरा हजार रुपयांवरून 37 हजार 440 रुपयांपर्यंत जाणार आहे. जर समजा आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना 1.92 इतका फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला तर कर्मचाऱ्यांचा किमान बेसिक पगार अठरा हजार रुपयांवरून 34 हजार 560 रुपयांपर्यंत जाणार आहे.
महागाई भत्ता शून्य होणार का?
प्रत्येक नव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणारा महागाई भत्ता रिसेट केला जात असतो. सध्या सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात असून जेव्हा नवीन वेतन आयोग लागू होईल तेव्हा हा महागाई भत्ता पुन्हा एकदा शून्य केला जाणार आहे.