7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ती बातमी आहे पगारवाढी संदर्भात. खरे तर मोदी सरकारने मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली होती.
मार्च 2025 मध्ये केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका झाला. हि वाढ एक जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली.

या महागाई भत्ता वाढीचा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना लाभ मिळाला. दरम्यान केंद्रातील सरकारच्या निर्णयानंतर देशातील विविध राज्यांमधील राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला.
महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवण्यात आला. महत्त्वाची बाब अशी की महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील येत्या काही दिवसांनी सुधारित होणार आहे,
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा 55% इतका केला जाईल अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान अशी सारी परिस्थिती असतानाच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा पगार वाढीचा लाभ मिळणार आहे.
खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ मिळते आणि यानुसार आता 2025 मधील दुसऱ्या महागाई भत्ता वाढीचा लवकरच लाभ दिला जाणार आहे.
कधी मिळणार महागाई भत्ता वाढीचा
खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो, मात्र ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू केली जाते. तसेच दुसऱ्यांदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना दसरा अन दिवाळीच्या सुमारास महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात असतो आणि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जात असते.
यानुसार जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली आहे आता जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे. म्हणजेच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा पगार वाढीचा लाभ मिळणार आहे.
जानेवारी 2025 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 55 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय मात्र आता जुलै महिन्यापासून यामध्ये किती वाढ होणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
किती वाढणार महागाई भत्ता?
यावेळी, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून थेट 58% वर जाऊ शकतो.
पगारात किती वाढ होणार?
सध्याच्या 55% महागाई भत्ता नुसार 18 हजार रुपये बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला 9900 इतका महागाई भत्ता मिळतोय म्हणजेच बेसिक पगार आणि महागाई भत्ता असा एकूण 27 हजार 900 रुपये इतका पगार मिळतोय.
मात्र जेव्हा महागाई भत्ता 58% इतका होईल तेव्हा अठरा हजार रुपये बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला दहा हजार 440 रुपये इतका महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजेच महिन्याचा महागाई भत्ता 540 रुपयांनी वाढणार आहे.