राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याबाबतचा जीआर कधी निघणार ? समोर आली मोठी अपडेट

Tejas B Shelar
Published:
7th Pay Commission

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% झाला आहे. मार्च महिन्यात याबाबतचा जीआर निघाला असून याचा लाभ हा जानेवारी महिन्यापासून दिला जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित होत असतो.

जानेवारी महिन्यापासून ची महागाई भत्ता वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू झाली असून जुलै महिन्यापासून ची महागाई भत्ता वाढ लागू करण्याचा निर्णय हा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात घेतला जाणार आहे. एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता वाढ ठरवली जात असते.

जानेवारी ते जून या कालावधीमधील एलआयसीपीआयची आकडेवारी जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार हे ठरवणार आहे. आतापर्यंत एआयसीपीआयची जानेवारी ते एप्रिल या कालावधीमधील आकडेवारी समोर आली आहे.

जेव्हा मे आणि जून या महिन्यांची देखील एआयसीपीआयची आकडेवारी समोर येईल तेव्हा खऱ्या अर्थाने जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार हे स्पष्ट होणार आहेत. मात्र तज्ज्ञांनी यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% ऐवजी तीन टक्के एवढाच वाढणार असे म्हटले आहे.

म्हणजे जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% होईल अशी शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे. मात्र राज्य कर्मचाऱ्यांचा अजून जानेवारी 2024 पासूनचा महागाई भत्ता वाढलेला नाही. राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर जानेवारी महिन्यापासून 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे.

याबाबतचा निर्णय या चालू महिन्यातच होणार आहे. याचा जीआर येत्या काही दिवसांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून जारी केला जाईल अशी शक्यता आहे. म्हणजे महागाई भत्ता वाढीचा लाभ जुलै महिन्याच्या पगारांसोबतच दिला जाणार आहे.

तसेच राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणारी ही महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून राहणार असल्याने जानेवारी ते जून या कालावधी मधील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील जुलै महिन्याच्या पगारांसोबत दिली जाणार आहे.

निश्चितच जर येत्या काही दिवसांनी वर्तमान शिंदे सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा जीआर निर्गमित केला तर या सदर नोकरदार मंडळीला मोठा दिलासा मिळणार असून जुलै महिन्याच्या पगारासोबत त्यांना एक मोठी रक्कम मिळणार आहे. वाढत्या महागाईने बेजार झालेल्या नोकरदार मंडळीला या महागाई भत्ता वाढीचा नक्कीच मोठा दिलासा मिळेल असे म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe