सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ! महागाई भत्ता तब्बल सहा टक्क्यांनी वाढणार ? DA 59% वर जाणार

सध्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. मात्र नवीन सरकार सत्तेवर आल्याबरोबर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर ही वाढ जुलै 2024 पासूनच लागू राहणार आहे.

Tejas B Shelar
Published:
7th Pay Commission

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता वाढी संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला. हि वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली.

पण, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून अनेक दिवसांचा काळ उलटला असतानाही राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित झालेला नाही. म्हणून राज्य सरकारी कर्मचारी माहे जुलै 2024 पासून 03 टक्के महागाई भत्ता (DA) वाढीची अगदीच आतुरतेने वाट पाहत आहेत.

सध्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. मात्र नवीन सरकार सत्तेवर आल्याबरोबर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के होणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर ही वाढ जुलै 2024 पासूनच लागू राहणार आहे. अशातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखीन 06 टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चक्क 59 टक्क्यांवर पोहोचणार आहे. खरंतर महागाई भत्ता हा वर्षातून दोनदा सुधारित केला जात असतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित होत असतो.

यानुसार जुलै 2024 पासूनचा महागाई भत्ता सुधारित झाला असून आता जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 59% दराने महागाई भत्ता मिळू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

म्हणजेच महागाई भत्त्यात यावेळी चक्क सहा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महागाई भत्ता वाढीची भेट अजून मिळालेली नाही.

परंतु जेव्हा राज्यात महायुतीचे सरकार अधिकृतरित्या स्थापित होईल तेव्हा याबाबतचा सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. असे असतानाचं आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 6% DA वाढीची चाहूल लागली आहे.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन महिन्यात अमेरिकेतील निवडणुका तसेच चीनचे नवीन आर्थिक धोरण यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम दिसून आले आहेत.

यामुळे महागाईचा टक्का अधिकच वाढला आहे, ज्यामुळे जानेवारी 2025 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये मोठी वाढ दिसून येईल, असे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe