सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय बदलले जाणार ? वाचा सविस्तर

सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवा वय बदलले जाणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरु आहेत. पण खरंच केंद्रातील सरकारचा तसा विचार आहे का? याबाबत सरकारची भूमिका नेमकी काय आहे? याच संदर्भात एक नव अपडेट हाती आल आहे.

Published on -

7th Pay Commission : 2025 हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरत आहे. या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी मान्य केली. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील सरकारकडून आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.

खरे तर आठव्या वेतन आयोगाची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात होती. मात्र गेल्या वर्षी या मागणीने सर्वात जास्त जोर पकडला. अखेर कार आठव्या वेतन आयोगाची मागणी आता मान्य झाली असून अशातच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

खरंतर आठवा वेतन आयोगासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांची आणखी एक मोठी मागणी म्हणजेच सेवानिवृत्तीचे वय वाढवणे. दरम्यान, आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार की कमी होणार ? या संदर्भात सरकारकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

काय आहेत डिटेल्स 

खरे तर, गेल्या काही वर्षांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय चेंज होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. याबाबत वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू असतात. वास्तविक, शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या काही सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक काळ नोकरी करायची असते तर काही सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेच्या आधी सेवानिवृत्ती घ्यायची असते.

यामुळे सरकारच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय चेंज करण्याबाबत काही निर्णय घेतला जाणार आहे का असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पण आता यावर सरकारने आपली भूमिका सुद्धा क्लियर केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की वरिष्ठ सभागृहातील म्हणजेच राज्यसभेतील खासदार तेजवीर सिंह यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या बाबत प्रश्न उपस्थित केला होता.

काय होता प्रश्न ? 

त्यांनी सरकारला असे विचारले होते की, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयोमर्यादेत बदल होणार आहे का ? दरम्यान याच प्रश्नाच्या उत्तरात सरकारकडून सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयोमर्यादा बदलण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या जे आहे तेच पुढे कायम राहणार आहे. जर काही केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीचे वय ओलांडल्यानंतरही सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली तर अशा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काळ नोकरीत ठेवता येऊ शकते का?

म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाऊ शकते का? असाही प्रश्न उपस्थित होत होता दरम्यान यावर उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत केंद्रातील सरकार सध्या तरी कोणताच विचार करत नसल्याचे म्हटले आहे. तसेच सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की, सेवानिवृत्तीच्या वयाच्या बाबत सध्या जे नियम आहेत त्या नियमात सरकारकडून कोणताच बदल केला जाणार नाही.

वेळेआधी निवृत्त होता येणार का? 

तथापि, सध्याच्या नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेच्या आधी सेवानिवृत्त होता येणार आहे. मात्र यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना नियमांचे पालन करावे लागणार आहे. अटी आणि शर्तीच्या अधीन राहून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेच्या आधी निवृत्ती घेता येणार आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष इतके आहे. मात्र, काही कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट परिस्थितीमध्ये वेळेच्या आधीच सेवानिवृत्त होण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो मात्र यासाठी साहजिकच काही अटींचे पालन करावे लागते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News