7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना देखील लवकरच एक मोठा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एक प्रलंबित मागणी पुढील महिन्यात पूर्ण होईल अशी आशा आहे.
खरे तर पुढील महिन्याच्या म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. दरम्यान या रक्षाबंधनाच्या आधीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळेल असे बोलले जात आहे.

किती वाढणार महागाई भत्ता
सध्या राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात असून, हा महागाई भत्ता जुलै 2024 पासून लागू आहे. दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% इतका असून हा भत्ता जानेवारी 2025 पासून लागू आहे.
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात सुधारित करण्यात आला होता. मार्च महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली.
याच धरतीवर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता देखील सरकारकडून सुधारित करण्यात आला आहे.
मात्र राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना अजूनही 53% दरानेच महागाई भत्ता मिळतोय. मात्र लवकरात आता राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका होणार असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू केली जाणार आहे.
महागाई भत्ता फरकाची सुद्धा रक्कम मिळणार
मीडिया रिपोर्टनुसार, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय जारी होऊ शकतो.
म्हणजेच रक्षाबंधनाच्या आधीच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळेल असा दावा केला जातोय. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% निवडून 55% करण्याबाबतचा शासन निर्णय येत्या काही दिवसांनी निर्गमित होण्याची दाट शक्यता आहे.
तथापि या संदर्भातील अधिकृत माहिती अजूनही फडणवीस सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही, यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय कधी जारी होणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
पण निर्णय कधीही निघाला तरी देखील ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असून राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाचा सुद्धा लाभ दिला जाणार आहे.