8 वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सध्या 22,450 आणि 33,850 रुपये पेन्शन मिळणाऱ्या पेन्शनधारकांना किती पेन्शन मिळणार ? वाचा सविस्तर….

आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना काय लाभ मिळणार ? त्यांचा पगार किती वाढणार असे असंख्य प्रश्न सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना भेडसावत आहेत. दरम्यान, आज आपण आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर पेन्शन धारकांची पेन्शन किती वाढणार ? याची माहिती पाहणार आहोत.

Published on -

8th Pay Commission : 16 जानेवारी 2025 हीच तीच तारीख आहे ज्या दिवशी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. आपण केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयाला गेलेल्या एका दशकातील सर्वात मोठा निर्णय म्हणू शकतो. कारण केंद्रातील मोदी सरकारने एका दशकानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा वेतन आयोग लागू करण्याची मोठी घोषणा केली असून लवकरच नव्या आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुद्धा सुरू होणार आहे.

खरे तर सध्याचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आला आहे. तसेच सध्याचा सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी समाप्त होणार आहे. वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे.

यामुळे एक जानेवारी 2026 पासून नवा आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरे तर केंद्रातील सरकारने नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिलेली आहे मात्र अजून नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती काही झालेली नाही.

पण लवकरच हे देखील काम पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात नव्या वेतन आयोगाचे काम सुरू होणार आहे. दरम्यान नव्या वेतन आयोगाबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

खरंतर नवीन आठवा वेतन आयोगाचा देशातील लाखो कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना फायदा होणार आहे. दरम्यान आज आपण नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शन धारकांची पेन्शन नेमकी कितीने वाढणार याच संदर्भातील सविस्तर आढावा घेणार आहोत.

पेन्शन धारकांची पेन्शन कितीने वाढणार ?

केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची प्रतिक्षा केवळ सध्या स्थितीला केंद्र शासकीय सेवेत कार्यरत असणारे सरकारी नोकरदारच नाही तर पेन्शनधारकही आतुरतेने करत आहेत. दरम्यान नवा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर आणि शिफारशी अमलात आल्यास पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता जाणकार लोकांकडून वर्तवण्यात आली आहे.

पण प्रत्यक्षात नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शन धारकांची पेन्शन कितीने वाढणार? याच एक कॅल्क्युलेशन आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. खरंतर आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.0 किंवा 2.08 इतका राहणार असे बोलले जात आहे.

अशा परिस्थितीत आता आपण 22,450 मासिक पेन्शन मिळणाऱ्या आणि 33,850 रुपये मासिक पेन्शन मिळणाऱ्या पेन्शनधारकांचा पगार कितीने वाढणार याबाबतची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. जर फिटमेंट फॅक्टर 2.0 इतका झाला तर 22,450 पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांना आठवा वेतन आयोग अंतर्गत 44,900 रुपये पेन्शन मिळणार आहे.

तसेच, फिटमेंट फॅक्टर 2.08 झाल्यास 22 हजार 450 रुपये पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांना 46,696 रुपये इतकी पेन्शन मिळणार आहे. तसेच 33,850 मासिक पेन्शन मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2.0 फिटमेंट फॅक्टरनुसार 67,700 आणि 2.08 फिटमेंट फॅक्टरनुसार 70,408 रुपये इतकी पेन्शन मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe