8th Pay Commission : जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला. केंद्रातील मोदी सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली.
त्यामुळे सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत आणि नवीन आठवावेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. खरंतर प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत आला आहे.

सध्याचा सातवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला होता आणि नवा आठवावेतन आयोग हा दहा वर्षांनी म्हणजेच एक जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान नवीन आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा पगार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
आठवा वेतन आयोगात पगार कितीने वाढणार?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 2006 मध्ये म्हणजे जेव्हा सहावा वेतन आयोग लागू झाला त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 2750 रुपयांनी वाढवण्यात आला होता आणि हा किमान मूळ पगार 7000 रुपये एवढा झाला.
दहा वर्षांनी म्हणजे 2016 मध्ये जेव्हा सातवा वेतन आयोग लागू झाला त्यावेळी किमान मूळ पगार हा 11000 रुपयांनी वाढवण्यात आला आणि किमान मूळ पगार 18000 रुपये एवढा झाला.
दरम्यान आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नव्या आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार हा सवाल उपस्थित केला जातोय. खरंतर कर्मचाऱ्यांचा पगार हा फिटमेंट फॅक्टरनुसार ठरवला जाणार आहे.
जर समजा नव्या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.92 इतका झाला आणि समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा बेसिक पगार लेव्हल 1 च्या कर्मचाऱ्यांचा म्हणजेच किमान 18 हजार रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार 34,560 रुपयांपर्यंत वाढणार आहे. मात्र या संदर्भातील अधिकृत निर्णय जेव्हा होईल तेव्हाच पगार नेमका किती वाढणार हे समजू शकणार आहे.
या कर्मचाऱ्यांचा पगार 40 टक्क्यांनी वाढणार
आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांचा पगार तब्बल 40 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या शिपाई,
लिपिक आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) इत्यादींसारखे सर्वात खालच्या पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांचा पगार 15000 रुपयांनी म्हणजेच 40 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.