8th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारकडून महागाई भत्ता वाढीची भेट मिळाली. गेल्या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के करण्यात आला. दरम्यान आता महागाई भत्ता वाढीची भेट मिळाल्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना एका गोष्टीची ओढ लागली आहे आणि ती गोष्ट म्हणजे आठवा वेतन आयोग.
आठवा वेतन आयोगाचा लाभ नेमका कधी मिळणार याची अंमलबजावणी कधीपासून होणार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर पगारात किती वाढ होणार असे असंख्य प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात आहेत. दरम्यान आठव्या वेतन आयोगाच्या याच प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

केव्हापासून लागू होणार आठवा वेतन आयोग
आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला 17 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने मान्यता दिली. अजून आठव्या वेतन आयोगाच्या समितीच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती झालेली नाही मात्र येत्या काही दिवसात ही नियुक्ती पूर्ण होईल आणि त्यानंतर या समितीच्या माध्यमातून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी शासनाकडे पाठवल्या जाणार आहेत.
या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. पण, सध्याचा सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला असून प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होतो. पहिल्या वेतन आयोगापासून प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत आला आहे.
यानुसार आता 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होऊ शकतो, कारण 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी समाप्त होणार आहे. नव्या वेतन आयोगामुळे सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासंबंधी शिफारसी करतो.
7व्या वेतन आयोगाद्वारे कर्मचाऱ्यांच्या वेतनात 14.27 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. दरम्यान कर्मचाऱ्यांचा पगार ठरवण्यात फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका निभावतो यामुळे आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर काय असणार हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
फिटमेंट फॅक्टर काय असेल?
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.28 ते 2.86 दरम्यान राहू शकतो आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन 14,000 ते 19,000 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
सध्याच्या वेतन आयोगात म्हणजेच सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांसाठीचा फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 7,000 रुपयांवरून 18,000 रुपये झाले होते. नवीन वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.28 ते 2.86 दरम्यान राहू शकतो.
पगारात किती वाढ होणार
आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 30 ते 50 टक्क्यांची वाढ होऊ शकते. म्हणजेच त्यांचा पगार 14000 पासून ते 19 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो. जर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा सरासरी मासिक पगार 1 लाख रुपये धरला, तर 8व्या वेतन आयोगामुळे वेतनात 14 ते 19 टक्के वाढ होऊ शकते.
सरकारने वेतन आणि पेन्शन वाढीसाठी 1.75 लाख कोटी रुपयांचा अंदाजपत्रक दिल्यास, कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 14,600 रुपयांची वाढ होऊ शकते. जर हा बजेट 2 लाख कोटी रुपये केला तर वेतनवाढ 16,700 रुपये आणि 2.25 लाख कोटी रुपये बजेट केल्यास वेतनवाढ 18,800 रुपये प्रति महिना होऊ शकते. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा पगार 19,000 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
अंदाजानुसार, 8व्या वेतन आयोगामुळे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 51,480 रुपयांपर्यंत वाढू शकते. जर फिटमेंट फॅक्टर 1.92 असेल, तर वेतनात 92 टक्के वाढ होऊन किमान वेतन 18,000 रुपयांवरून 34,560 रुपये होईल. तथापि हा एक अंदाज आहे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी समोर आल्यानंतरच नेमका पगार किती वाढणार हे स्पष्ट होणार आहे.